आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोयोटाची चंद्रावर चालणारी स्वयंचलित कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानची सर्वात मोठी कार कंपनी टोयोटा चंद्रावर चालणारी कार तयार करत आहे. या कारला “जक्सा लूनर रोव्हर’ असे नाव देण्यात आले आहे. चार चाके असलेल्या या स्वयंचलित कारमध्ये दोघांना बसण्याची जागा असून ही १०,००० किमीपर्यंत चालू शकेल. टोयोटा या कारला जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन संस्थेसाठी तयार करत आहे. ही कार २०२९ मध्ये चंद्रावर घेऊन जाण्याची संस्थेची योजना आहे. रोव्हरला अंतराळ प्रवाशांच्या आधी चंद्रावर पोहोचवण्यात येणार आहे. नंतर प्रवासी ज्या ठिकाणी उतरतील, त्या ठिकाणी ती आपोआप पोहोचेल.  


- टोयोटाची ही जक्सा लूनर रोव्हर ६ मीटर लांब असेल.  
- या कारच्या आत १३ चौ. मीटरची जागा असेल.   
- संशोधक त्यांचे अंतराळातील सूट काढून यामध्ये बसू शकतील.  
- ही बॅटरीवर चालेल, जी सौर ऊर्जेवर चार्ज होईल.

बातम्या आणखी आहेत...