आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोयोटा लाँच करणार रंग-रूप बदललेली, जास्त शक्तिशाली नवी कॅमरी; जाणून घ्या कारचे फिचर्स 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो- टोयोटा किर्लाेस्कर मोटर्स आपली न्यू जनरेशन सेडॉन कॅमरी' पुढील आठवड्यात १८ तारखेस लाँच करत आहे. आठव्या पिढीतील या कॅमरीत काही महिन्यांपूर्वी थायलंडमध्ये लाँच केले होते. नव्या कॅमरीत अनेक बदल केले आहेत व जुन्या मॉडेलमून इंटेरिअर, फ्युयल इफिशियन्सी व रायडिंग कम्फर्टच्या प्रकरणात पूर्णपणे वेगळी आहे. यामध्ये २.५ लिटरचे फोर सिलिंडर एटकिंसन सायकल पेट्रोल इंजिन आहे. यामुळे कामगिरी १८ एचपी वाढते. यात १७६ एचपीची शक्ती देते व २२१ किलो वॅटची इलेक्ट्रिक मोटरशी जोडली आहे. यामुळे संमिश्र पॉवर आऊटपूट २०८ एचपी झाली आहे. याचा आणखी एक फायदा हा की, कमी आरपीएम किंवा हिवाळ्यातही येथून धूर दिसणार नाही. कार एका लिटर इंधनात २३ किमीपर्यंत धावू शकेल, असा कंपनी दावा करू शकते, असे मानले जात आहे. नवे फ्लॅटफॉर्म हलका आहे. त्यात नवी कॅमरी लांब, रुंद व उंच जास्त झाली आहे. बूट स्पेसही १० लिटर वाढून ५९८ लिटर झाला आहे. हेडलॅप्स पातळ आहे व खूप मागच्या बाजूस व्ही-शेप तयार करते. ऑडी स्लेट्सशी ग्रिल भाग खूप भव्य झाला आणि यातूनच हे मॉडेल गर्दीतूनही वेगळे दिसते. 

 

ही आतापर्यंत सर्वात सुंदर कॅमरी संबोधली जाते. असे असले तरी मागच्या बाजूने कारमध्ये जास्त बदल केलेला नाही. टोयोटाच्या पाच प्रचलित रंगांमध्ये ही मिळेल. इंटेरिअर इन्फोटेनमेंटमध्ये खूप बदल केला आहे. सात इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आहे. हा ९ स्पीकारचा जेबीएल डॉल्बी ऑडिओ सिस्टिमशी जोडला आहे. रिमोट-कीमध्ये मेमरी फीचर असून यातून ड्रायव्हर सीट स्थितीची आठवण करून देते. वायरलेस क्यूआय चार्जिंगसोबत १२ वी यूएसबी चार्जर मिळतो. स्टिअरिंगवरही खूप फीचर्स आहेत. बसण्याची जागा वाढवली आहे. 

पॅसेंजर सीटही २० एमएमपर्यंत सरकता येते. हायब्रीड मॉडेलचा उपयोग केला जाणारी बॅटरीही रिअर पॅसेंजर सीट्सच्या खाली ठेवली आहे. यामुळे बूट स्पेस कमी झाले नाही. केबिनचा इलेक्ट्रिक मूनरूफ आपोआप फिरतो. ऑटो गाइड कंट्रोल, इको मोडमध्ये आपोआप स्वयंचलित होते. यामुळे इंधन खूप कमी जळते. हे आल्यानंतर श्कॉडा सुपर्ब, फॉक्सवॅगन पसाट व होंडा अॅकॉर्ड हायब्रीडला एक तुल्यबळ स्पर्धा मिळेल. याची एक्स शोरूम किंमत ३९ लाख रुपयांच्या जवळपास असू शकते. 

 

सुरक्षेची विशेष काळजी 
उच्च गुणवत्तेच्या पोलादाचे सेंट्रल टनल सुरक्षेचा विश्वास देते. ९ एअरबॅग्ज, ईबीडी, एबीएस, ब्रेक असिस्ट, पार्क असिस्टसारखे अनेक फीचर्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...