आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Accident: शेतात मशागत करताना ट्रॅक्टर उलटले, वाहनाखाली दबल्याने चालकाचा जागीच मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - तालुक्यातील इचखेडा शिवारात मशागत करताना ट्रॅक्टर अनियंत्रीत होत कलंडले. या भीषण अपघातात चालक ट्रॅक्टरखाली दाबल्या गेला असून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे. पीडित व्यक्तीचे नाव प्रमोद देवराम तायडे असून ते 38 वर्षांचे होते. 


किनगाव खुर्द परिसरात राहणारे कांदा व्यापारी तसेच भाडे तत्त्वावर शेत मशागत करून देणारे प्रमोद सोमवारी इचखेडा शिवारात आले होते. ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. 19 -4719 ने ते दुपारी शेतविहीरीजवळ काम करत होते. याच दरम्यान त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर पूर्णपणे पलटले आणि त्याखाली चालक प्रमोद दाबल्या गेले. या घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावून गेले. तोपर्यंत प्रमोद यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, स्थानिकांनी प्रमोद यांचा ट्रॅक्टरखाली दबलेला मृतदेह बाहेर काढला. तसेच शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. हवालदार सुनिल तायडे यांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. प्रमोद तायडे यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.