आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुरेश कपिले
मनेगाव - बैलांच्या साहाय्याने शेती करण्याची पद्धत आता मागे पडत आहे. यांत्रिक शेतीला महत्त्व आल्याने शेतीबरोबरच जोडव्यवसाय म्हणूनही ट्रॅक्टरकडे पाहिले जाते. हाच हेतू बाळगून यांत्रिक शेतीसोबतच जोडव्यवसाय म्हणून सहा गावांतील ७० महिलांना ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. बाएफ आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला.
मनेगाव येथे उपक्रमाला सुरुवात करताना १५ महिलांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात आले. महिंद्रा कारखान्याचे ग्राहक व्यवस्थापक सुशांत पाटील, बाएफचे दिगंबर चौधरी, सुनील घुगे, विवेक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम सुरू करण्यात आला.
असे होणार प्रशिक्षण
प्रत्येकी आठ दिवसात महिलांना ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ट्रॅक्टरची तांत्रिक माहिती देण्यासाठी प्रात्यक्षिक घेतले जाते. त्यासाठी २ प्रशिक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिन्यानंतर पुन्हा आठ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात मार्च व एप्रिल महिन्यात शेती औजारे चालवण्यासह ट्रॅक्टरचालकाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर महिलांना ट्रॅक्टर चालवण्याचा परवानाही मोफत दिला जाणार आहे. तर महिलांना आवश्यक वाटल्यास महिंद्रा कारखान्याकडून ट्रॅक्टरही देण्याची व्यवस्था आहे. यात कारखान्याकडून कर्जरूपाने अर्थसाहाय्य केले जाईल.
बचत गटातील महिलांची निवड
मनेगाव, पाटोळे, धोंडवीरनगर, बारागावपिंप्री, देशवंडी, आटकवडे या सहा गावांतील भाग्यश्री, स्वामी समर्थ, माउली, आदर्श, नावीन्य, पार्वती, श्रीगणेश, महादेवा, रामकृष्णहारी, गोविंदप्रभू, श्रावणी आदी बचत गटांतील महिलांना प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले. सुमारे ७० महिलांचा प्रशिक्षणात समावेश आहे.
स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न
ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती करण्याबरोबरच महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न
उपक्रमातून होत आहे. यांत्रिक शेती करण्याबरोबरच ट्रॅक्टरच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळू शकेल.
- सुनील घुगे, सिन्नर, बाएफ
ट्रॅक्टर चालवेल हे स्वप्नातही नव्हते
स्वप्नातही वाटत नव्हते की आपण ट्रॅक्टर चालवू शकू. घरी ट्रॅक्टर घेऊन स्वत: काम करण्याचा आत्मविश्वासही आला. आता यांत्रिक शेती करू शकेल.
- योगिता चकोर, प्रशिक्षणार्थी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.