आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इटलीमध्ये 14 हजार कोटी रुपयांचा व्यापार वाढला :गुइसिपी काँटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारत-इटली यांच्यातील २४ व्या तंत्रज्ञान परिषदेला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्गदर्शन केले. या वेळी इटलीचे पंतप्रधान गुइसिपी काँटी यांचीही उपस्थिती होती. काँटी एक दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. परिषदेपूर्वी त्यांनी मोदींसमवेत द्विपक्षीय चर्चा केली. उभय नेत्यांत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, अपारंपरिक ऊर्जा, दहशतवाद इत्यादी मुद्द्यांवर चर्चा झाली.  


परिषदेत मोदी म्हणाले, भारताने तंत्रज्ञानाला सामाजिक न्याय, सशक्तीकरण, सक्षम सरकारी तंत्र व पारदर्शकतेसाठीचे माध्यम बनवले आहे. भारत आता माहिती-तंत्रज्ञान सॉफ्टवेअर क्षेत्रातील शक्तिशाली देश म्हणून आपली आेळख आता पुढच्या स्तरावर नेऊ इच्छितो. देशाची तशी वाटचाल सुरू आहे. देशात जन्म प्रमाणपत्रापासून निवृत्तिवेतनापर्यंतच्या सुविधा आज ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध आहेत. ३०० हून अधिक योजनांना उमंगद्वारे उपलब्ध करून दिले आहे. इटलीसह कमी खर्चात अंतराळात पाठवण्याची व्यवस्था भारताने करून दिली आहे, असे मोदींनी सांगितले.

 

इटलीच्या डिजिटल क्रांतीसाठी भारतीय अभियंत्यांची मदत घेणार 
इटलीचे आर्थिक व्यवहार विभागाचे उपमंत्री मायकल गेरासी म्हणाले, त्यांचे सरकार लाल फितीच्या कारभार संपवून जास्तीत जास्त परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या कार्यक्रमास अंतिम रूप देत आहे. भारत व इटलीदरम्यान भविष्यातील द्विपक्षीय आर्थिक संबंधाचे महत्त्वाचे स्तंभ बनतील. भारतातील कुशल अभियंत्यांच्या मदतीने इटलीत डिजिटल क्रांती आणण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.  

 

युरोपीय संघात इटलीच्या ६०० कंपन्या सक्रिय, सीआयआयचे संयुक्त आयोजन  
इटलीच्या युरोपीय संघात भारत सर्वात मोठा पाचवा व्यापारी भागीदार आहे. दोन्ही देशांत व्यापार क्षेत्रात वार्षिक उलाढाल सुमारे ७९ हजार कोटी रुपये आहे. सध्या भारतात इटलीच्या ६०० कंपन्या काम करतात. या परिषदेचे आयोजन भारतीय उद्योग संघ (सीआयआय) व विज्ञान-तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. आरोग्य, अंतराळ, शिक्षण, स्वच्छता तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, माहिती-तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांवर त्यात भर दिला.

 

भारत-इटली व्यापार, सुरक्षा, दहशतवादाविरोधात परस्पर सहकार्यावर सहमत

इटली पंतप्रधान काँटी परिषदेत पुढे म्हणाले, मोदींसमवेत माझी द्विपक्षीय बैठक अत्यंत यशस्वी झाली. त्यात आम्ही द्विपक्षीय संबंधाच्या विविध पैलूंवर चर्चा केली. भारत-इटली यांच्यातील व्यापार ६४ हजार कोटींवरून ७८ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. व्यापार क्षेत्रात दोन्ही देश आणखी पुढे वाटचाल करतील. दोन्ही देश व्यापार, तंत्रज्ञान व सुरक्षेसह दहशतवादाच्या विरोधात एकजुटीने लढतील, अशी ग्वाही काँटी यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...