आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉलमार्ट-फ्लिपकार्ट विरोधात व्यापाऱ्यांची आज भारत बंदची हाक; सात कोटी ट्रेडर्स सहभागी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वॉलमार्ट-फ्लिपकार्ट यांच्यातील कराराच्या विरोधात शुक्रवारी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी देशभरातील व्यापाऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. यामध्ये सुमारे सात कोटी ट्रेडर्स सहभाग घेणार आहेत. ट्रेडर्स असोसिएशनच्या वतीने जंतरमंतरवर प्रदर्शन करण्यात येणार आहे. 


फ्लिपकार्ट आणि अमेरिकी कंपनी वॉलमार्ट यांच्यातील कराराला प्रतिस्पर्धी आयोगाने (सीसीआय) मंजुरी दिली आहे. त्यामुळे वॉलमार्टचा १६ अब्ज डॉलरसह फ्लिपकार्टमधील ७७ भागीदारी खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाविरोधात 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'ने (सीएआयटी) न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे (कॅट) सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, देशभरातील व्यापारी शुक्रवारी भारत बंद ठेवणार आहेत. यामध्ये ७ कोटी ट्रेडर्स सहभाग घेतील. त्यांनी सांगितले की, देशातील ४२ लाख कोटी रुपयांच्या किरकोळ व्यापाराविषयी कोणीच विचार करताना दिसत नाही. कंपनी ऑफलाइन बाजारातही प्रवेश करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 

बातम्या आणखी आहेत...