आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

परंपरा : जाणून घ्या, श्रीगणेशाला दुर्वा का अर्पण करतात?

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

प्रथम पूज्य श्रीगणेशाला विशेष रूपात दूर्वा अर्पित करण्यात येते. असे मानण्यात येते की, दूर्वा वाहिल्याने गणपतीची कृपा प्राप्त होते. तसेच घरामध्ये रिद्धी-सिद्धीचा वास राहण्यास मदत होते. गणपतीला दूर्वा सगळ्याच व्यक्ती अर्पित करतात. परंतु ब-याच कमी लोकांना हे माहित आहे की, दूर्वा का वाहिली जाते? त्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे? गणपतीला दूर्वा वाहण्याची परंपरा ही खुप जुनी आणि प्राचीन आहे. या पाठीमागची कथा फार प्रचलित आहे. कथेनुसार प्राचीन काळात अनलासुर नावाचा एक दैत्य होता. या दैत्याच्या कोपामूळे स्वर्ग आणि धरतीवर त्राही-त्राही माजली होती. अनलासुर ऋषि-मुनी आणि सामान्य नागरिकांना जिंवत गिळून टाकायचा. दैत्याच्या या त्रासाने त्रस्त होऊन देव इंद्रासहित सर्व देवी-देवता आणि प्रमुख ऋषि-मुनि महादेवाची प्रार्थना करायला लागले. सर्वांनी महादेवाची प्रार्थना केली आणि अनलासुराचा आतंकाचा नाश करण्याची विनंती केली. महादेवाने सर्व देवी-देवतांचे आणि ऋषि-मुनींची प्रार्थना ऐकून सांगितले की, अनलासुराचा अंत केवळ गणपतीच करु शकतो. महादेव म्हणाले की, अनलासुराचा अंत करण्यासाठी त्याला गिळंकृत करावे लागेल आणि हे काम फक्त गणपती करु शकतो. गणपतीचे पोट बरेच मोठे आहे त्यामुळे अनलासुराला गिळणे सोपे आहे. हे ऐकल्यानंतर सर्व देवी-देवता गणपतीकडे गेले. गणपतीची स्तुती करुन त्यांना प्रसन्न केल्यानंतर श्रीगणेशाने अनलासुराला पकडून गिळंकृत केले. जेव्हा गणपतीने अनलासुराला गिळले त्यानंतर त्याच्या पोटामध्ये जळजळ होण्यास सुरुवात झाली. ब-याच प्रकारचे उपाय केल्यानंतरही गणपतीच्या पोटातील जळजळ शांत होत नव्हती. तेव्हा कश्यप ऋषींनी 21 दूर्वांची जूडी तयार करुन गणपतीला खाण्यास दिली. दूर्वांची जूडी खाल्यानंतर पोटातील जळजळ शांत झाली. तेव्हापासून गणपतीला दूर्वा वाहण्याच्या परंपरेला प्रारंभ झाला.

0