Home | Jeevan Mantra | Dharm | Tradition: worship tips in Marathi

परंपरा : पूजन कर्मामध्ये करावा तांब्याचे ताट, फुलपात्र आणि कलशाचा उपयोग

रिलिजन डेस्क, | Update - Jul 10, 2019, 12:05 AM IST

सोने, चांदी, पितळ आणि तांब्यापासून बनवलेले भांडे पूजेसाठी मानले जाते शुभ

 • Tradition: worship tips in Marathi

  देवाच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या भांड्यांचा उपयोग केला जातो. हे भांडे कोणत्या धातूचे असावेत आणि कोणत्या धातूचे नसावेत या संदर्भात विविध नियम सांगण्यात आले आहेत. जे धातू पूजन कर्मामध्ये वर्ज्य सांगण्यात आले आहेत त्यांचा उपयोग पूजेन कर्मामध्ये करू नये. असे केल्यास धर्म-कर्माचे पूर्ण पुण्य प्राप्त होणार नाही. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार पूजेसाठी कोणकोणते धातू शुभ आणि कोणते अशुभ आहेत...

  हे धातू मानले जातात शुभ
  देवाची उपासना हा एक असा उपाय आहे ज्यामुळे मोठमोठ्या अडचणी सहज दूर होतात. पूजेमध्ये भांड्याचेही महत्त्व जास्त प्रमाणात आहे. शास्त्रानुसार वेगवेगळे धातू वेगवेगळे फळ देतात. यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणही आहे. सोने, चांदी, पितळ, तांब या धातूंचा उपयोग शुभ मानण्यात आला आहे.


  हे धातू मानले जातात अशुभ
  पूजा आणि धार्मिक क्रियेमध्ये लोखंड, स्टील आणि अ‍ॅल्युमीनियमला अपवित्र धातू मानले गेले आहे. या धातूंपासून देवाच्या मूर्तीसुद्धा तयार केल्या जात नाहीत. लोखंडाला हवा, पाण्याने गंज चढतो. पूजा करताना देवाच्या मूर्तीला आपल्या हाताचा स्पर्श होता असतो. देवपूजेत मूर्तीला पाणी वाहिले जाते. त्यामुळे लोखंडाला लागलेल्या गंजामुळे आपल्या त्वचेवर त्याचा वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे लोखंड देवपूजेसाठी वर्ज्य आहे. देवपूजेत सोने, चांदी, तांबे, पितळ या धातूंच्या भांड्याचा उपयोग करावा. या धातूंपासून आपल्या त्वचेला कोणतही त्रास होत नाही.

Trending