आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवाला कशामुळे घातली जाते प्रदक्षिणा आणि कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवाची पूजा विविध चरणांमध्ये केली जाते. पूजेमध्ये हार-फुल अर्पण केले जातात, दिवा लावून आरती केली जाते, नैवेद्य दाखवला जातो, वस्त्र, दागिने अर्पण केले जातात, प्रदक्षिणा घातली जाते. अशाप्रकारचे विविध शुभकर्म पूजेमध्ये केले जातात. प्रदक्षिणा घातल्याने पुण्य वाढते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार देवाला प्रदक्षिणा घातल्याने शारीरिक ऊर्जा वाढते. येथे जाणून घ्या, प्रदक्षिणेशी संबंधित काही खास गोष्टी...


का घातली जाते प्रदक्षिणा ?
पूजा झाल्यानंतर देवाच्या मूर्तीजवळ सकारत्मक उर्जा तयार होते. ती उर्जा ग्रहण करण्यासाठी देवला प्रदक्षिणा घातली जाते. मंदिरात सदैव मंत्र उच्चार सुरु असतात आणि त्यामुळे मंदिरातील वातावरणामध्ये सकारत्मक उर्जेचा प्रभाव असतो. सकारत्मक ऊर्जेमुळे मन आणि वातावरणाची शुद्धी होते. या कारणांमुळे देवाला प्रदक्षिणा घातली जाते.


अशाप्रकारेही करू शकता प्रदक्षिणा
प्रदक्षिणा सामन्यतः कोणत्या देवाच्या मूर्ती भोवती चारही बाजुंनी फिरून घातली जाते. परंतु कधीकधी देवमूर्तीची पाठ भिंतीकडे असल्यामुळे प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसते. घरांमध्येही पूजा करताना देवमूर्तीची स्थापना एखाद्या भिंतीजवळ केलेली असते. अशा वेळेस देवमूर्तीसमोर गोल फिरून प्रदक्षिणा घातली जाऊ शकते.


या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या...
नेहमी लक्षात ठेवावे की, प्रदक्षिणा सदैव हाताच्या उजव्या बाजूने सुरु करावी, कारण दैवी शक्तीच्या आभामंडलाची गती दक्षिणावर्ती असते. डाव्या बाजूने प्रदक्षिणा घातल्यास दैवी शक्तीच्या ज्योतिर्मंडलाची गती आणि आपल्या शरीरामधील विद्यमान दिव्य अणूंमध्ये विरोध निर्माण होतो, ज्यामुळे आपले तेज नष्ट होऊ शकते. याउलट हाताच्या उजव्या बाजूने प्रदक्षिणा घातल्यास वातावरणातील सकारात्मक उर्जा सहजरीत्या प्राप्त होते.


पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात...

बातम्या आणखी आहेत...