आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदू धर्मामध्ये मंदिरात जाण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळी लोक आपल्या दिवसाची सुरुवात मंदिरात गेल्यानंतरच करत होते परंतु सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात सर्वांना मंदिरात जाणे शक्य होत नाही. वेळेच्या अभावामुळे काही लोकं इच्छा असूनही मंदिरात जाता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये मंदिराच्या फक्त कळसाचे (शिखर) दर्शन घेतले तरी पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होते.
यामुळे करावे मंदिराच्या कळसाचे दर्शन
- उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, ग्रंथामध्ये लिहिले आहे की, शिखर दर्शनम् पाप नाशम्। म्हणजेच कोणत्याही मंदिराच्या कळसाचेचे दर्शन केल्याने पापांचा नाश होतो.
- तुम्हाला दररोज मंदिरात जाऊन देवाचे दर्शन करणे शक्य नसल्यास कमीत कमी मंदिर दिल्यास कळसाचे दर्शन घ्यावे. आहे त्या ठिकाणाहून देवाचे स्मरण करत कळसाचे दर्शन घ्यावे.
- हिंदू धर्मामध्ये मंदिराच्या कळसाचे दर्शनही देवतांच्या दर्शनाएवढे पुण्य देणारे सांगण्यात आले आहे. मंदिराचा कळसही तेवढाच महत्त्वपूर्ण आहे, जेवढी मंदिरातील मूर्ती.
- यामागे मानशास्त्रही आहे. आपण मंदिराच्या कळसाचे दर्शन करताना काहीकाळासाठी आपले मन पॉझिटिव्ह एनर्जीने भरते. हीच ऊर्जा चांगले काम करण्यासाठी प्रेरित करते आणि देवावरचा विश्वास आणखी मजबूत होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.