आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Traffic Fine: Odisha Truck Driver Fined Challan Over Rupees 6 Lakh For MVA Violation In Sambalpur

ओडिशात ट्रक मालकाला लागला 6 लाख 53 हजारांचा दंड; तरीही अधिकारी म्हणतात, नवीन नियम तर लावलेच नाहीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी देशातील सर्वात मोठ्या दंडाची पावती ओडिशात देण्यात आली आहे. या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांनी 6 लाख 53 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ड्रायव्हरच्या हातात दिलेली पावती ट्रक मालकाच्या नावे आहे. तो मूळचा नागालंड येथील रहिवासी आहे. सुधारित मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर ठोठावण्यात आलेला देशातील हा सर्वात मोठा दंड मानला जात आहे. तरीही, ज्या अधिकाऱ्यांनी ही पावती फाडली त्यांच्या मते दंड जुन्या नियमांना अनुसरूनच लावण्यात आला आहे. दरम्यान, दंडाच्या पावतीच्या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

नवे नियम तर लावलेच नाही...
> अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक 10 ऑगस्ट रोजी संबलपूर येथे वाहतुकीचे नियम मोडताना पकडण्यात आला होता. ट्रकच्या कागदपत्रांची तपासणी झाली. त्यावेळी, ट्रकचे जुलै 2014 पासूनचे कर भरलेलेच नव्हते. त्यामुळेच, ट्रकवर आधी ओडिशा मोटर वाहन कायदा कर कायदा अंतर्गत 6 लाख 40 हजार रुपयांचा दंड निश्चित करण्यात आला. यानंतर ट्रक ड्रायव्हरकडे विमा, पोल्युशन सर्टिफिकेट आणि परमिट नसल्याने उर्वरीत दंड आकारण्यात आला. त्याने ट्रकमध्ये प्रवासी सुद्धा भरले होते. या सर्वच ट्रॅफिक नियमांच्या उल्लंघनावरून ट्रक मालकाला 6 लाख 53 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
> त्यातही अधिकाऱ्यांनी सांगितले, की ही दंडाची रक्कम जुन्या नियमानुसारच लावण्यात आली आहे. नवीन नियम लावले असते तर ट्रक मालकाला आणखी 7 लाख रुपये अतिरिक्त भरावे लागले असते. दरम्यान, या ट्रक चालकाने ती रक्कम अद्यापही भरलेली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, दिल्लीत सुद्धा एका ट्रक ड्रायव्हरच्या हातात 2 लाख 5 हजार रुपयांची पावती देण्यात आली आहे. परंतु, ओडिशातील दंडाने त्याचा रेकॉर्ड देखील मोडला आहे.

बातम्या आणखी आहेत...