आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर सोलापुरात दंडात्मक कारवाई, रस्त्यावरच अडथळा ठरत असल्याने ठोठावला दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- वाहतुकीथ अडथळा केल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळेंच्या ताफ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर पोलिसांनी ताफ्यातील 8 गाड्यांवर ही कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा दौरा सुरू आहे. या दरम्यान सोलापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात हजर राहिल्या होत्या. 

सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसीएशनच्या सभागृहात सुप्रिया सुळे यांचा "संवाद ताईंशी" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. या कार्यक्रमाच्या हॉल बाहेर सुळे यांच्या गाड्यांचा ताफा उभा होता. या ताफ्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला, त्यामुळे सोलापूर पोलिसांनी ताफ्यातील 8 गाड्यांवर कारवाई केली. प्रत्येक गाडीवर दोनशे रुपये प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

सोलापुरातील डफरीन चौक हा रहदारीचा भाग असल्यामुळे, मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक पोलिसांनी या गाड्या येथून हलवण्याच्या सूचना दिल्या, पण सूचना देऊनही गाड्या न हल्ल्याने पोलिसांनी सर्व गाड्यांवर कारवाई केली. मोटर वाहन कायद्यानुसार या सर्व गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सभागृहाजवळ कुठेही पार्किंगची व्यवस्था केली नाही आणि कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी दिली असूनही पोलिसांनी जाणिवपूर्वक कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...