आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Traffic Police Do Not Have Driving License, PUC And Insurance, Fined 34 Thousand In Ranchi

ट्रॅफिक पोलिसाकडे नव्हते ड्रायविंग लायसंस, पीयूसी आणि इंश्योरंस, लागला 34 हजारांचा दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची(झारखंड)- राजधानीमध्ये शुक्रवारी आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्रॅफिक दंड लागला आहे. ट्रॅफिक एसपी अजीत पीटर डुंगडुंगने एका ट्रॅफिक हवालदार राकेश कुमारला 34 हजारांचा दंड ठोठावला. राकेशला गुरुवारी रात्री बाइकवरुन प्लाजा चौक ट्रॅफिक पोस्टवरुन मिशन चौकाकडे जाताना स्वतः ट्रॅफिक एसपीने पकडले.ट्रॅफिक पोलिसात कार्यरत असल्याने दुप्पट दंड
राकेशसोबत मागे बसलेल्या एएसआय रामेश्वर रायने हेलमेट घातले नव्हते. ट्रॅफिक एसपीने दोघांना शुक्रवारी ऑफिसमध्ये बोलावले. राकेशकडून गाडीचे पेपर मागितले. पण त्याच्याकडे ड्रायविंग लाइसंस, पॉल्यूशन आणि इंश्योरंस यापैकी काहीच नव्हते. त्यामुळे 17 हजारांचा दंड लागला. पण राकेश स्वतः ट्रॅफिक पोलिसात कार्यरत असल्यामुळे त्याच्याकडून दुप्पट दंड घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...