आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी सायकल अडवून फाडली 500 रुपयांची पावती! हेलमेटवरूनही झापले; जाणून घ्या काय आहे नियम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - ट्रॅफिक पोलिसांनी एखाद्या सायकलस्वाराला हेलमेटसाठी अडवल्याचे आपण ऐकलेही नसेल. परंतु, केरळ पोलिसांनी एका सायकलस्वाराच्या हातात 500 रुपयांची पावती दिली. त्या व्यक्तीने रस्त्यावर हेलमेट वापरले नाही. सोबतच त्याची सायकल ओव्हरस्पीडने जात होती असेही म्हटले आहे. पोलिसांनी सुरुवातीला त्या व्यक्तीच्या विरोधात 2000 रुपयांचा दंड आकारला होता. परंतु, आपण खूपच गरीब असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी 500 रुपयांचा दंड लावला. सोशल मीडियावर पसरवली जाणारी ही बातमी खरी आहे. 


असे आहे प्रकरण
- उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला कासिम हा केरळमध्ये काम करतो. कामावर जाण्यासाठी तो सायकलचा वापर करतो. परंतु, पोलिसांनी त्याला वेळीच अडवून नियम मोडल्याप्रकरणी दंड आकारला. त्याने सायकल चालवताना हेलमेट घातले नाही आणि क्षमतेपेक्षा वेगाने जात होता असे आरोप लावले. यासाठी केरळच्या ट्रॅफिक पोलिसांनी कासिमला 2000 रुपये भरण्यास सांगितले. परंतु, आपली दैनंदिन कमाई 400 रुपये सुद्धा नाही आणि आपण हा दंड भरूच शकत नाही असे कासिमने सांगितले. यानंतरही पोलिसांनी त्याच्याकडून 500 रुपयांची वसूली केली. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, पोलिसांनी पावती फाडताना त्यावर वाहन क्रमांक सुद्धा टाकला. हा वाहन क्रमांक एका दुसऱ्याच स्कूटरचा आहे. तो स्कूटर एका महिलेच्या नावे रेजिस्टर आहे. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकल मीडियाने हा मुद्दा लावून धरला आणि तेव्हा एक ट्रॅफिक सब इंस्पेक्टर दोषी सापडला. सध्या पोलिस विभागाने त्या पीएसआय विरोधात कुठलीही तक्रार केली नाही. परंतु, कारवाईचे आश्वासन दिले आहे. 


असा आहे ओव्हर स्पीड आणि हेलमेटचा नियम
- या प्रकरणावर बोलताना भोपाळ ट्रॅफिक पोलिसांतील डीएसपी गोविंद रावत यांनी सांगितले, की सायकलच्या स्पीड संदर्भात कुठलाही ट्रॅफिक नियम नाही. सोबतच, सायकल चालवणाऱ्याने हेलमेट घालणे आवश्यक नाही. ते आपल्या सुरक्षिततेसाठी हेलमेटचा वापर करू शकतात. सायकलची नोंदणी आरटीओ कार्यालयात होत नाही. अशात नंबर नसलेल्या वाहनावर दंडाची पावती फाडण्याचा प्रश्नच नाही.
- मोटर वेहिकल अॅक्ट (MVA) 1988 च्या कलम 177 नुसार, बाइक आणि स्कूटर चालवणाऱ्यांनी हेलमेट घालणे बंधनकारक आहे. हेलमेट न घालता पकडले गेल्यास पहिल्यांदा 100 रुपये आणि दुसऱ्यांदा पकडले गेल्यास 300 रुपये दंड आकारला जातो. दिवसभरातून एका गोष्टीसाठी एकदाच दंड आकारता येतो.
- त्या-त्या परिसरानुसार स्पीड ठरलेल्या आहेत. मोटर वेहिकल अॅक्ट 1988 च्या कलम 183 अन्वये ओव्हरस्पीडसाठी पहिल्यांदा 400 रुपये आणि दुसऱ्यांदा 1000 रुपये दंड आकारला जातो. शहरात स्पीडची लिमिट ताशी 60 किमी आहे.

बातम्या आणखी आहेत...