Home | National | Other State | Traffic Police in Coimbatore gets 70 body worn cameras, these will record and live telecast videos

सावधान वर्दी पाहतेय! तामिळनाडू ट्रॅफिक पोलिसांच्या युनिफॉर्मवरच लागले कॅमेरे, प्रत्येक घडामोडीची रेकॉर्डिंग

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 18, 2019, 04:04 PM IST

नियम मोडणाऱ्या वाहनचालकांसह भ्रष्टाचारावरही करडी नजर

 • Traffic Police in Coimbatore gets 70 body worn cameras, these will record and live telecast videos

  चेन्नई - तामिळनाडूच्या कोयंबतूर जिल्ह्यात ट्रॅफिक पोलिसांना वर्दीवर लावण्यासाठी कॅमेरे देण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून रस्त्यावर होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली जाणार आहे. याच व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. हे कॅमेरे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी या कॅमेऱ्यांचे वाटप उईर नावाच्या एका सेवाभावी संस्थेने केले आहे. त्या पोलिस आयुक्तांची अधिकृत मंजुरी आहे.


  प्रत्येक डिव्हाइस इंटरनेटशी कनेक्ट
  शहरातील पोलिस आयुक्त सुमित शरण यांनी उईर एनजीओकडून हे कॅमेरे कार्यालयात आणले. सुरुवातीला अशा स्वरुपाचे डिव्हाईस 70 पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आले. यापैकी 20 डिव्हाइस इंटरनेटला कनेक्ट करण्यासाठी त्यामध्ये समिकार्ड टाकण्यात आले. या पोलिस कर्मचाऱ्यांचे कॅमेरा फुटेज थेट पोलिसांच्या नियंत्रण कक्षात जाणार आहेत. एका कॅमेऱ्यात एकावेळी सलग 8 तास व्हिडिओ टेलिकास्ट केले जाऊ शकते. याचा उपयोग रस्त्यावर होणारी निदर्शने आणि सार्वजनिक कार्यक्रमांत होणार आहे. ऑनलाइन देखील हे व्हिडिओ उपलब्ध राहतील.


  भ्रष्टाचार रोखण्यासाठी देखील वापरणार कॅमेरे
  पोलिस आयुक्त शरण यांनी सांगितल्याप्रमाणे, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ट्रॅफिक पोलिसांच्या कामगिरीत पारदर्शकता येईल. यातून भ्रष्टाचाराला आळा घालण्यात मोठी मदत होईल. पोलिस कमर्चारी जे काही करत आहेत त्याचे थेट प्रक्षेपण नियंत्रण कक्षात होईल. यातून पोलिस विनाकारणच्या वादात अडकण्यापासून दूर राहतील. सोबतच, एखाद्या वाहनचालकाने नियम मोडल्यास योग्य दंड वसूल केला की नाही याची माहिती मिळेल.

 • Traffic Police in Coimbatore gets 70 body worn cameras, these will record and live telecast videos
 • Traffic Police in Coimbatore gets 70 body worn cameras, these will record and live telecast videos
 • Traffic Police in Coimbatore gets 70 body worn cameras, these will record and live telecast videos

Trending