आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वाहतूक पोलिस घेतात पाचशे रुपये, पावती देतात दोनशेची म्हणत जिल्हाकचेरीवर मोर्चा 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती : वाहतूक पोलिस, वाहतूक विभागाच्या प्रचंड जाचक अटी व मानसिक त्रासापायी व्यवसाय करणे कठीण झाले आहे. वाहतूक पोलिस कोणतेही कारण नसताना पाचशे रुपये वसुली करून हातात पावती मात्र दोनशे रुपयांची ठेवून लुबाडणूक करत असल्याची व्यथा सोमवारी, १९ आॅगस्ट रोजी वाहन चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली.    वाहतूक विभागाकडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची होणारी लुट थांबवावी या प्रमुख मागणीसाठी आज आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार वाहन चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यापूर्वी संत ज्ञानेश्वर सभागृहात वाहन चालक-मालक हक्क परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेत संघटनेच्या सदस्यांनी आपल्या व्यथा आमदार बच्चू कडू यांच्यासमोर मांडल्या. परिषद आटोपल्यानंतर दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या वेळी मुद्रांक नोंदणी कार्यालयानजीक मोर्चाला अडवण्यात आले. येथे आमदार कडू यांनी उपस्थितांना संबोधित केले. मोर्चात शेकडोच्या संख्येने वाहनचालक उपस्थित होते. त्यानंतर आमदार कडू यांच्या नेतृत्वात दहा जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. या वेळी जिल्ह्याअंतर्गत प्रवासी वाहतुकी दरम्यान वाहतूक पोलिस सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही पाचशे रुपये वसुली करत आहे. परंतु पावती मात्र केवळ दोनशे रुपयांची देत आहेत. स्कूल बसमधील विद्यार्थी मान्यतेमध्ये वाढ करण्याची मागणी प्रलंबित असताना एखादा विद्यार्थीही तांत्रिक अडचणीमुळे बसमध्ये जास्त झाल्यास अव्वाच्या सव्वा दंड आकारला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात मात्र स्कूल बसला सीट वाढवून दिल्या आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यातही सीट वाढवून देण्यात यावी. वाहतूक पोलिसांकडून जिल्हा अंतर्गत वाहतुकीसाठी 'टीपी' ची मागणी केली जात आहे. 'टीपी' नसल्यास अव्वाच्या सव्वा दंडाची नोटीस घरी पाठवल्या जात आहे. हाताला नोकऱ्या नसल्यामुळे उच्चशिक्षित बेरोजगार नाईलाजाने वाहतूक व्यवसाय करत आहे. परंतु वाहतूक विभागाच्या कार्यालयापासून रस्त्यावरील वाहतुकीदरम्यान पदोपदी लुबाडणूक होत असल्यामुळे व्यवसाय कसा करावा असा प्रश्न शिष्टमंडळातील सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. वाहतूक विभागाच्या कार्यालयात दलालांचा सुळसुळाट असून विविध कामे करण्यासाठी दलालांकडून वसुली करत असल्याचा आरोप उर्वरित. वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर शिष्टमंडळातील सदस्यांनी केला. ऑनलाइन तक्रारी, कागदपत्रे मिळवण्यासाठीही वेळेची मर्यादा असल्यामुळे व वाहतूक पोलिसांच्या लुबाडणुकीमुळे प्रचंड नुकसान सोसावे लागत असल्याची व्यथा या वेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी मांडल्या. या वेळी आमदार बच्चू कडू यांनी कामकाजात सुधारणा करण्याचा सल्ला वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. वाहन चालकांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करून त्यांच्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी संघटनेच्या सदस्यांना विविध परवानग्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी आमदार बच्चू कडू यांच्यासह संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश चांगोले, अमित वानखडे, रामभाऊ वानखडे, हर्षद इंगोले, नीलेश वडे, सतीश उज्जैनकर, विजय ठाकरे, नीलेश पाठक, राजेश ठाकरे, उमेश मेहरे उपस्थित होते.    एका दिवसाच्या 'टिपी'साठी सहाशे रुपये : खासगी वाहन चालकांना एका दिवसाची वाहतूक पास काढण्यासाठी सहाशे रुपये मोजावे लागतात. पंधरा दिवसांच्या पाससाठी अडीच हजार रुपये मोजावे लागतात. दरम्यान दररोज वाहतूक विभागाकडून पास काढणे शक्य होत नाही. त्यातच भाडेही अनिश्चित असल्यामुळे 'टिपी'चा नाहक खर्च मानगुटीवर बसतो. कधीकधी रात्रीही भाडे मिळते, अशावेळी वाहतूक विभागाचे कार्यालय बंद असल्यामुळे 'टिपी' कशी काढावी असा प्रश्नही शिष्टमंडळाने उपस्थित केला.    संकेत कॉलनीत एकाच रात्री...  दरम्यान सोमवारी सकाळी चौधरी हे घरी आले असता त्यांच्या घराच्या मुख्य दाराला असलेले कुलूप व कोंडा चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. या वेळी एका बेडरूममध्ये असलेले कपाट फोडून त्यामध्ये असलेल्या सोन्याच्या बांगड्या, सुमारे ४० ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या, कानातील दागिना तसेच १५ हजार रुपये रोख असा जवळपास १ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मे महिन्यातच चौधरी यांच्या लहान मुलाचा विवाह झाला होता. त्यामुळे नववधूचे घरात असलेले दागिने चोरट्यांनी लंपास केले. चौधरी आज सकाळी घरात आल्यानंतर त्यांना सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसले. चोरट्यांनी चौधरी यांच्या घरातील स्वयंपाक खोलीत असलेले डबेसुद्धा हुसकल्याचे दिसत होते. चोरीची माहिती मिळताच गाडगे नगरच्या पोलिस उपनिरीक्षक चंदापुरे त्यांच्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते. तसेच ठसेतज्ज्ञांना सुद्धा या वेळी पाचारण करण्यात आले होते.    दुसरी चोरी संकेत कॉलनीमध्ये राहणारे बीएसएनएलचे निवृत्त कर्मचारी नीळकंठ त्र्यंबक केराम (६३) यांच्या घरी झाली. रविवारी रात्री नीळकंठ केराम तसेच त्यांचा मुलगा, स्नुषा हे पहिल्या माळ्यावर झोपले होते. त्यामुळे खाली कोणीही नव्हते. चोरट्यांनी खालच्या घरात जाऊन कपाटाचे लॉक तोडून त्यामधून अंगठी, कानातील दागिने असा सुमारे ११ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. नीळकंठ केराम हे पहाटे ६ वाजता उठल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. या दोन्ही चोरी प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. या दोन्ही घटनांमुळे शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसत आहे.     वाहतूक विभागाकडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची होतेय लूट  जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार कडू व संघटनेचे पदाधिकारी.    वाहन चालक संघटनेच्या वतीने केलेल्या मागण्या  वाहनचालकांना असंघटित कामगारात समाविष्ट करा, चालक-मालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे. चालकांना मतदानासाठी पोस्टल मतदानाचा अधिकार देण्यात यावा, चालकांना किमान वेतन आयोगाअंतर्गत समाविष्ट करावे, व्यावसायिक हॉटेलमध्ये चालकांना विश्रांतीसाठी सोय उपलब्ध करून द्यावी, स्पीड गर्व्हनरची वेग मर्यादा वाढवावी, विमा व फायनान्स कंपन्यांकडून होणारे शोषण थांबवावे, जड वाहतूक परवान्याचे शुल्क कमी करावे, प्रशासनाकडून प्रवासादरम्यान होणारा त्रास कमी करावा, या मागण्या करण्यात आल्या.  वाहन चालक मालकांच्या मोर्चाला संबोधित करताना आमदार बच्चू कडू.  समस्या न सुटल्यास सरकारसमोर मांडणार  वाहतूक विभागाच्या अखत्यारित वाहन चालकांच्या समस्या न सुटल्यास सरकारसमोर त्यांच्या समस्या मांडणार आहे. बच्चू कडू, आमदार. 

0