आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातल्या सगळ्यात जास्त ट्रॅफिक असलेल्या 403 शहरांमध्ये मुंबई नंबर-1, तर दिल्ली चौथ्या स्थानावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई जगातील सगळ्यात जास्त ट्रॅफिक असलेले शहर बनले आहे. ही बाब 56 देशातील 403 शहरांच्या ट्रॅफिक आणि वर्दळीवर तयार केलेल्या तयार केलेल्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. मुंबईमध्ये पीक आवर्समध्ये लोकांना आपल्या नियोजित ठिकाणावर पोहचण्यासाठी 65% जास्त वेळ लागतो. या यादीत 58% सोबत दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. ही रिपोर्ट लोकेशन टेक्नोलॉजी कंपनी टॉमटॉमने तयार केली आहे, ती अॅपल आणि उबेरसाठी नाकाशे तयार करते.


रिपोर्टनुसार, ट्रॅफिकच्या दबावाच्या बाबतीत कोलम्बियाची राजधानी बोगोटा(63%) दूसरे, पेरूची राजधानी लीमा(58%)तिसऱ्या आणि रूसची राजधानी मॉस्को(56%)पाचव्या स्थानावर आहे.


ट्रॅफिकमध्ये लागलेल्या जास्तीच्या वेळेवर काढली आहे रिपोर्ट
कंपनीने ही रिपोर्ट सगळ्यात जास्त ट्रॅफिकच्या दरम्यान लोकांना आपल्या नियोजित जागेवर पोहचण्यासाठी किती वेळ लागतो, त्याच्या आधारावर काढली आहे. टॉमटॉमचे जनरल मॅनेजर बारबारा बेलपीयरेने सांगितले की, मुंबईमध्ये अंदाजे दर एका किलोमीटरवर 500 कार चालतात. हे दिल्लीपेक्षाही जास्त आहे.


मुंबईमध्ये संध्याकाळी 5 ते 8 दरम्यान सगळ्यात जास्त ट्रॅफिक
रिपोर्टनुसार, मुंबईमध्ये प्रवास करण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ रात्री 2 ते सकाळी 5 पर्यंत आहे, यावेळी सगळ्यात कमी ट्रॅफिक असते. तर सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान आपल्या ठिकाणावर पोहचण्यासाठी लोकांना 80 % जास्त वेळ लागतो. तर संध्याकाळी 5 ते 8 च्या दरम्यान ही वेळ 102 % वर जाते.

बातम्या आणखी आहेत...