• Home
  • Business
  • Traffic Rules, Driving Penalties September 2019, List Update; Driving without license, No helmet, Drunken driving

New Rules / ड्रायव्हिंग, बँकिंग आणि कर संदर्भातील 7 महत्वाचे नियम आजपासून लागू, विना परवाना वाहन चालवल्यास 5 हजारांचा दंड

आजपासून विम्यावर सुद्धा 5 टक्के कर; रेल्वे, मालमत्तेसह बँकिंग महागणार

Sep 01,2019 11:04:00 AM IST

नवी दिल्ली - सामान्य माणसाशी संबंधित 7 नवीन नियम आजपासून लागू करण्यात आले आहेत. यामध्ये मोटर वेहिकल अॅक्ट, बँकिंग आणि विमासह प्रवास सुद्धा महाग करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार आजपासून दारु पिऊन गाडी चालवल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. सोबतच, विमा मॅच्योर झाल्यानंतर त्यावर सुद्धा 5 टक्के कर लादला जात आहे. एवढेच नव्हे, तर घर खरेदी करणे सुद्धा खर्चिक ठरणार आहे.


1. वाहनाचा विमा नसल्यास 2 हजारांचा दंड
मोटर वेहिकल अॅक्ट (सुधारित)-2019 अन्वये नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आजपासून गाडी चालवताना परवाना नसल्यास 5 हजार रुपये आणि दारू पिउन गाडी चालवल्यास 10 हजारांचा दंड लागणार आहे. सीट बेल्ट नाही लावल्यास 1 हजार रुपये आणि वाहनाचा विमा नसल्यास 2 हजार रुपये दंड लावला जाईल.


2. विमा पॉलिसी मॅच्योरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर 5% कर
आजपासून विमा मॅच्योर झाल्यानंतर मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेवर टॅक लागेल. भरलेल्या एकूण प्रीमियम व्यतिरिक्त जेवढी रक्कम राहील त्यावर कर लावला जाईल. आतापर्यंत वार्षिक प्रीमियम विम्याच्या रकमेपेक्षा 10% पेक्षा अधिक नसल्यास मॅच्योरिटीवर कर लादला जात नव्हता.


3. एसबीआयचे गृहकर्ज होणार स्वस्त
होम लोनवर एसबीआयचे नवे व्याज दर लागू करण्यात आले आहेत. 30 लाख रुपयांपर्यंतचे लोन 8.25% नाही तर 8.05% टक्के व्याजाने मिळणार आहे. नवीन दर नव्या ग्राहकांसह जुन्या ग्राहकांना देखील लागू होतील. एसबीआयने सण आणि उत्सवांचे सीझन पाहता स्वस्त कर्जांची ऑफर काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती.


4. एक कोटीपेक्षा अधिक रक्कम काढल्यास 2 टक्के कर
रोख रकमेच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात याची घोषणा केली होती. हा नियम आता लागू करण्यात आला आहे. एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक खात्यांमधून मग त्या सरकारी बँका असो वा पोस्ट ऑफिस... 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास 2% टीडीएस कापला जाईल. 31 ऑगस्ट पर्यंत 1 कोटी रुपये काढलेले असतील तर यापुढे काढल्या जाणाऱ्या प्रत्येक रकमेवर 2 टक्के कर भरावा लागणार आहे.


5. ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग महागले
आयआरसीटीसीने रेल्वे तिकीटांच्या बुकिंगवर काही काळ थांबवण्यात आलेला सेवा कर अर्थात सर्व्हिस चार्ज पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी सर्व्हिस चार्ज बंद करत असल्याचे घोषित केले होते. आता नव्याने लागू करण्यात आलेल्या सर्व्हिस चार्जनुसार, नॉन एसी तिकीटांवर 15 रुपये आणि एसी क्लास तिकीटांवर 30 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, सर्व्हिस चार्ज लावल्यानंतरही वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अतिरिक्तरित्या लावला जाणार आहे.


6. घर महागणार, किंमत 50 लाखांपेक्षा जास्त असल्यास 1% टीडीएस
स्थावर मालमत्ता खरेदीवर टीडीएस कपातीमध्ये क्लब मेंबरशिप फी, कार पार्किंग आणि वीज, पाण्याचे शुल्क समाविष्ट करण्यात आले आहेत. हे सर्व मिळून मालमत्तेची किंमत 50 लाखांपेक्षा अधिक झाल्यास तर ते खरेदी करणाऱ्याला 1 टक्के टीडीएस द्यावाच लागेल.


7. प्रोफेशनल्सला 50 लाखांपेक्षा अधिक रक्कम दिल्यास 5 टक्के कर
कुठल्याही व्यक्तीने काँट्रॅक्टर किंवा प्रोफेशनलला 50 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम अदा केली असेल तर रक्कम देणाऱ्यास 5% टीडीएस कापावा लागणार आहे. घराची डागडुजी, लग्न किंवा इतर कार्यक्रम आणि इतर कुठल्याही प्रोफेशनल सेवेसाठी दिलेल्या रकमेवर टॅक्स लागणार आहे. हा टीडीएस एकूण रकमेवर लादला जात आहे.

X