आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक नियम; गुजरातेत दंड निम्मा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद : नवे वाहन-वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नव्या कायद्यानुसार वाढीव दंडाच्या रकमेत गुजरात सरकारने मंगळवारी कपात केली. काही दंडाची रक्कम थेट निम्म्याने घटवली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी यासंदर्भातील घोषणा केली. ते म्हणाले की, नव्या कायद्यातील दंडाची रक्कम केंद्र सरकारने सुचवलेली कमाल रक्कम होती. सविस्तर चर्चेअंती गुजरात सरकारने त्यात कपात केली आहे. ते म्हणाले की, नव्या नियमांतील कलम-५० मध्ये बदल केला आहे. गुजरातमध्ये नवे नियम १६ सप्टेंबरपासून लागू होतील.

- हेल्मेट न घातल्यास आता Rs.५०० दंड
- हेल्मेट न घातल्यास १००० ऐवजी ५०० रुपये दंड होईल.
- सीट बेल्ट न लावल्यास १००० ऐवजी ५०० रुपये दंड होईल.
- विनापरवाना वाहन चालवल्यास गुजरातेत ५००० ऐवजी दुचाकीसाठी दोन हजार, अन्य वाहनांसाठी ३००० रुपये दंड लागेल.
- ट्रिपल सीटसाठी १००० ऐवजी गुजरातमध्ये फक्त १०० रुपये दंड लागेल.
- अतिवेगासाठी २००० ऐवजी १५०० रुपये दंड द्यावा लागेल.
- लायसन्स, विमा, पीयूसी, आरसी नसल्यास प्रथम ५०० आणि दुसऱ्या वेळी १००० रुपये दंड आकारण्यात येईल.
 

बातम्या आणखी आहेत...