Home | Khabrein Jara Hat Ke | Tragic Conditions Of Widows In India Will Leave You Shocked

परंपरेच्‍या नावावर या विधवांच्‍या नशिबी आल्‍या नरकयातना, जगावे लागते असे जीवन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:21 AM IST

भारतात सती प्रथेचा खूप पूर्वी अंत झालेला असला तरी आजही पतीच्‍या मृत्‍यूनंतर अशा विधवा महिलांना मनसोक्त जगता येत नाही.

 • Tragic Conditions Of Widows In India Will Leave You Shocked

  भारतात सती प्रथेचा खूप पूर्वी अंत झालेला असला तरी आजही पतीच्‍या मृत्‍यूनंतर विधवा महिलांना मनसोक्त जगता येत नाही. काही महिलांना तर पतीच्‍या मृत्‍यू नंतर सासरहून हाकलून दिले जाते. अशा महिला उदरनिर्वाहासाठी रस्‍त्‍यावर भीक मागतात तर काही विधवा आश्रमात जातात. विधवांच्या या नरकासमान जीवनाबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

  मरेपर्यंत नरक यातना
  2005 नोबेल पीस प्राइजसाठी नामांकित मोहिनी गिरीया महिलांच्‍या अधिकारासाठी नेहमी लढत असतात. UN च्या एका उपक्रमातून त्यांनी विधवांच्‍या समस्‍या समोर आणल्या. विधवा होणे भारतात उच्चवर्गीय महिलांसाठीही मृत्‍यू समान असल्याचे त्या एकदा म्हणाल्या होत्या. अनेकदा पतीच्‍या निधनासाठी महिलांनाच जबाबदार मानले जाते. सती प्रथा संपली असली तरी विधवांच्या या नरकयातना कायम आहेत.


  कांदा, लसूण, बटाटे आणि मासे खाण्यास विरोध
  भारतात विधवांना कांदा, लसूण, बटाटे आणि मासे खाण्‍याला विरोध केला जातो. त्याचे कारणही चकित करणारे आहे. हे पदार्थ खाल्ल्यामुळे महिलांमध्‍ये उत्‍तेजना निर्माण होते असे म्हटले जाते. पतीच्‍या मृत्‍यूनंतर असे विचार मनात येणे हे पाप मानले जाते. त्यामुळे त्‍यांना यापासून दूर ठेवले जाते.


  पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आणखी कोणत्‍या नरक यातना भोगाव्‍या लागतात विधवांना..

 • Tragic Conditions Of Widows In India Will Leave You Shocked
  रंगीत जीवनाला विरोध

  रंगीविरंगी कपडे-दागिने वर्ज्य 
  विधवा महिला रंगीत कपडे, दागीने परिधान करू शकत नाही. इतर पुरुषांच्या नजरेपासून तिने वाचून राहावे म्हणून असे केले जाते. 
   

 • Tragic Conditions Of Widows In India Will Leave You Shocked

  ओझ म्‍हणुन जगतात जीवन
  वुमेन मीडिया सेंटरमध्‍ये राहणारी एक महिला वयाच्‍या 18 व्‍या वर्षीच  विधवा झाली होती. सासरच्‍या अनेक पुरूषांनी तिचे शारीरिक शोषण केले. ती सर्व सहन करत राहिली. पण जेव्‍हा सर्व असहाय्य  झाले तेव्हा मात्र तिने सासर सोडले.  पतीच्‍या निधनानंतर अनेक परिवार आपल्‍या सुनेला ओझे समजू लागतात. 
   

 • Tragic Conditions Of Widows In India Will Leave You Shocked

  काही वळतात वेश्‍या व्‍यवसायाकडे 
  सासरहून हाकलून दिलेल्या महिलांना वेश्‍या व्‍यवसायाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. अनेक महिला या काळोखात हरवून जातात. 

 • Tragic Conditions Of Widows In India Will Leave You Shocked

  चूक नसतानाही मिळते शिक्षा 
  या महिलांना त्यांनी न केलेल्या चुकीचीही शिक्षा भोगावी लागते. भारतातील जवळ-जवळ 40 मिलियन महिलांना आत्‍मसन्‍मानासाठी झगडत रहावे लागते.
   

Trending