आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नौशेरामध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण, जवान संदीप सावंत शहीद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीद संदीप सावंत - Divya Marathi
शहीद संदीप सावंत
  • चकमकीत कराडचे संदीप सावंत आणि उत्तर प्रदेशमधील गोरखा रायफल्सचे अर्जुन थापा यांना वीरमरण

सातारा- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी दुखद बातमी आली. नौशेरामध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना साताऱ्याचे जवान संदीप सावंत यांना वीरमरण आले आहे. संदीप सावंत सातारा जिल्ह्यातील मुंडे गावाचे रहिवासी होते. आज पहाटे संदीप सावंत यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेजवळ जंगलात दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे नेमकी संख्या समजू शकली नाही. मात्र संदीप नाईक यांनी आणि त्यांच्या पथकाने दहशतवाद्यांशी दोन हात करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या गोळीबारात संदीप सावंत आणि गोरखा रायफल्सचे अर्जुन थापा या दोघांना वीरमरण आले.
नवीन वर्षाच्या पहिल्याद दिवशी सीमेवरून महाराष्ट्रासाठी दुखद बातमी आली. नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीमध्ये संदीप सावंत या जवानाला वीरमरण आल्याने त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी दुपारपर्यंत शहिद संदीप सावंत यांचे पार्थिव मुळगावी येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. संदीप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, वहिणी आणि दोन महिन्यांची मुलगी आहे. संदीप यांच्या जाण्यामुळे सावंत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

बातम्या आणखी आहेत...