आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही बिलासंदर्भातील क्रिसिलचा अहवाल 'ट्राय'ने फेटाळला, टीव्हीचे बिल कमी झाले असल्याचा ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांचा दावा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. दूरसंचार नियामक ट्रायने नवीन नियमांमुळे ग्राहकांच्या टीव्ही बिलात वाढ होणार नसल्याचा बुधवारी पुन्हा दावा केला आहे. क्रिसिलच्या अहवालात नवीन नियमानंतर टीव्ही पाहण्याच्या बिलात २५ टक्क्यांची वाढ होणार असल्याचा दावा करण्यात आला होता, तो अहवालही ट्रायने फेटाळला आहे. 


ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी सांगितले की, क्रिसिलचा अहवालातील आधार चुकीचा आणि तथ्यहीन अाहे. त्यामुळे हा अहवालही चुकीचा आहे. ट्राय प्रमुखांनी सांगितले की, अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत की, त्यांचे डीटीएच प्रोव्हायडर्स चॅनलची निवड, मल्टिपल टीव्ही कनेक्शन आणि दीर्घ कालावधीच्या पॅकबाबत नवीन नियम पूर्णपणे लागू करताना दिसत नाहीत. त्यांनी सांगितले की, ग्राहकांना निवडण्याचे स्वातंत्र्य तर मिळणारच आहे. यामध्ये अडथळा निर्माण केल्यास तो नियामकांच्या विरोधात असेल. सर्व ऑपरेटरांना मल्टिपल टीव्ही कनेक्शनवरील नवीन नियमांवर दोन दिवसांच्या आत पालन करावे लागणार आहे. सर्व ऑपरेटरांना वेबसाइट अपडेट ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे जास्त लोकांनी वेबसाइटला भेट दिली तर ती डाउन होणार नाही. 

 

नवीन नियमांनुसार प्रत्येक सेट टॉप बॉक्ससाठी ग्राहकाला वेगवेगळे चॅनल निवडण्याची संधी मिळायला हवी. म्हणजेच घरात एकाच ऑपरेटरचे दोन कनेक्शन असतील तर दोन्ही कनेक्शनवर ग्राहकाला वेगवेगळे चॅनल निवडीचे स्वतंत्र असेल. एकाच घरात दुसऱ्या कनेक्शनवर ऑपरेटर नेटवर्क कपॅसिटी शुल्कात सूट देऊ शकतात किंवा असे शुल्क पूर्णपणे रद्दही करू शकतात. 

 

अव्वल-१० चॅनलवर २५% जास्त खर्च लागेल : क्रिसिल 
क्रिसिलने सांगितले होते की, नवीन नियमानुसार ब्रॉडकास्टर आणि डिस्ट्रिब्युटर किंमत निश्चित करत असल्याने ग्राहकांचे टीव्हीचे बिल वाढू शकते. जर ग्राहकाने अव्वल-१० चॅनलची निवड केली तर त्याचे बिल २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. ग्राहकाला आधी २३०-२४० रुपये द्यावे लागत होते, त्या जागी आता ३०० रुपये द्यावे लागतील. ग्राहकांनी अव्वल - ५ चॅनलचीच निवड केली तर त्यांचे बिल कमी होऊ शकते, असेही क्रिसलने म्हटले होते. 

 

क्रिसिलची निवडण्याची पद्धत ग्राहकांच्या विरुद्ध : ट्राय 
ट्रायनुसार क्रिसिलने ज्या आधारावर चॅनल निवडले आहेत, तो आधार ग्राहकांच्या विरोधात आहे. ग्राहक हिंदी, तामिळ, बांगला, मल्याळम व इंग्रजीचे चॅनल एकाच वेळी निवडणार नाही. अहवालात टीव्ही डिस्ट्रिब्युशन मार्केटची समज कमी असल्याचे दिसून येते. ट्राय प्रमुखांनी सांगितले की, दिल्ली आणि मुंबईमध्ये दोन वेगवेगळ्या ऑपरेटरांच्या जुन्या आणि नवीन किमतीची तुलना करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांतील बिल आधीच्या तुलनेमध्ये कमी झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...