Home | National | Other State | TRAI issue new rules for DTH and Cable Operators

सरकारने जारी केला आहे आदेश, TV वर येणाऱ्या 100 चॅनेलसाठी द्यावे लागतील फक्त इतके रूपये, 1 रूपये देखली जास्त घेणार नाही कोणी...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 12:42 AM IST

या तारखेपासून संपूर्ण देशात लागू होतील हे नवीन नियम

 • TRAI issue new rules for DTH and Cable Operators

  न्यूज डेस्क- टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या नवीन नियमांनूसार केबल ऑपरेटर आणि डीटीएच सर्विस प्रोव्हायडर आता 130 रूपयांपेक्षा जास्त नाही घेऊ शकत. कोणताच ऑपरेटर किंवा डीटीएच सर्विस प्रोव्हायडर कंपनी ग्राहकांना पॅकेज घेण्यास भाग नाही पाडू शकणार.


  ट्रायने अंदाज व्यक्त केला आहे की, मध्यप्रदेश सारख्या राज्यात फ्री चॅनल आणि पे चॅनल मिळून सामान्य उपभोक्त्यांना दर महीने 243 रुपये करावे लागतील. यात 65 फ्री टू एअर चॅनल, दूरदर्शनचे 23 चॅनल, 3 म्यूजिक चॅनल, 3 न्यूज चॅनल, 3 मूव्ही चॅनल आणि 3 जीईसी चॅनल म्हणजेच सगळे मिळून 100 चॅनेल असतील.

  यात कोणी ऑपरेटर तुमच्याकडून जास्त पैसे घेत असेल तर याची तक्रार तुम्ही ट्रायमध्ये करू शकता. ट्रायने याला अमलात आनण्यासाठी 29 डिसेंबर ही तारीख दिली आहे. देशभरात ट्रायचे 5 रीजनल ऑफीस आहेत, तेथे जाऊन तुम्ही तक्रार दाखल करू शकता.

  कुठे आहेत रीजनल ऑफिस
  हैदराबाद, कोलकाता, बंगळूर, भोपाळ आणि जयपुरमध्ये ट्रायचे रीजनल ऑफिस आहेत. त्याशिवाय दिल्लीच्या दूरदर्शन भवन, जवाहरलाल नेहरु मार्गावर ट्रायचे हेड ऑफिस आहे. त्याशिवाय ट्रायच्या ईमेल आयडी ap(at)trai(dot)gov(dot)in वर तक्रार देउ शकता किंवा फोन नंबर 91-11-2323 6308 (Reception) वर कॉंटॅक्ट करू शकता.

  ट्रायचे तीन महत्वपूर्ण अॅप
  माय कॉल अॅप - या अॅपवर तुमच्या कॉल क्वालिटीची तक्रार देऊ शकता.
  डीएनडी अॅप- या अॅपवरून काही वेळेसाठी इनकमिंग कॉल बंद करू शकता.
  माय स्पीड - या अॅपच्या मदतीने नेटची स्पीड चेक करू शकता.

Trending