आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Trailer Release Of Siddharth Malhotra's 'Marjawan'; Ritesh Deshmukh Will Get Be Seen As Villain

सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मरजावां'चा ट्रेलर रिलीज; अॅक्शन आणि रोमान्ससह रितेश देशमुखचा वेगळा अंदाज पाहायला मिळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - बॉलिवुड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्या 'मरजावां' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ट्रेलर रिलीज होताच त्यावर व्ह्यूज आणि लाइक्स मिळत आहेत. 'मरजावां' अॅक्शन आणि रोमांसने परिपूर्ण असेल असे वाटते. कारण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सिद्धार्थ एकीकडे गुंडांसोबत लढताना दिसत आहे तर दुसरीकडे सिद्धार्थ अभिनेत्री तारा सुतारियासोबत रोमांस करताना दिसत आहे.




'मरजावां'मध्ये रितेश देशमुखचा लुक आणि अंदाज खूप रंजक आहे. या चित्रपटात रितेशची उंची कमी दाखवलेली असली तरी त्याचे वागणे पूर्णपणे वेगळे आहे. सिद्धार्थ आणि रितेश 'एक विलन' चित्रपटाप्रमाणे एकमेकांसमोर उभे असलेले पाहण्यास मिळणार आहे.




'मरजावां' 22 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एका व्हायलंट आणि ड्रामॅटिक लव्ह स्टोरीवर आधारित आहे. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख व्यतिरिक्त तारा सुतारिया आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत आहे.