आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 'हिरकणी' चा ट्रेलर रिलीज, अंगावर काटा उभा करतात यातील दृश्य 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : दिवाळीला रिलीज होणाऱ्या मराठी चित्रपट 'हिरकणी' चे प्रमोशन सध्या जोरात सुरु आहे. दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी शेअर केलेल्या पोस्टरद्वारे प्रेक्षकांची उत्सुकता आधीच ताणली गेली होती आणि आता या चित्रपटाचा ट्रेलरदेखील रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात हिरकणीची भूमिका अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारत आहे. प्रसाद ओक यांनी शेअर केल्या ट्रेलरमध्ये चित्रपटातील सर्व घडामोडी अतिशय रंजक पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षक आता नक्कीच या चित्रपटाची अतिशय उत्सुकतेने वाट पाहतील. ट्रेलरमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे. तसेच सर्व दृशेही अतिशय उत्तम पद्धतीने चित्रित केली गेली आहेत. ट्रेलर पाहताना आपल्या अंगावर निश्चितच काटा उभा राहतो. हा चित्रपट 24 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.