आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाला आला हार्ट अटॅक, चेकिंगसाठी सीटखाली ठेवलेली बॅग उघडली तर पोलिसांना बसला धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदौली (बिहार) - राजेंद्र नगरहून दिल्लीला जाणाऱ्या 65 वर्षीय राजीव शर्मा अचानक रेल्वेतच बेशुद्ध झाले. इतर पॅसेंजर्सने आरपीएफला याबाबत सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी राजीव शर्मा यांना आरपीएफ आणि जीआरपीने हॉस्पिटलमध्ये नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी हार्ट अटॅक आल्याचे सांगत बीएचयूमध्ये पाठवले. रेल्वे पोलिसांनी जेव्हा सीटखाली ठेवलेली त्याची बॅग खोलली तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसला त्यांच्या बॅगमध्ये 50 लाख रुपये कॅश होते. 


रेल्वे पोलिसांनी सांगितले की, राजीव शर्मा यांना आरा आणि बक्सर दरम्यान हार्ट अटॅक आला होता. बेशुद्ध असल्यामुळे त्यांना काही सांगता येत नव्हते. एवढी मोठी रक्कम घेऊन ते का प्रवास करत होते, हेही ते सांगू शकले नाहीत. राजीव शर्मा नवी दिल्लीच्या सराय रोहिल्ला करोलबागचे राहणारे आहेत. सर्व नोटा दोन हजार आणि पाचशेच्या आहेत. पाटणा येथे राजीव शर्मा यांची जमीन होती, त्याचेच हे पैसे होते असे सांगितले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...