आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाराजी वहाटुळे
टाकळी जिवरग - औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी केवळ सहाच तालुक्यांत रेल्वे असून इतर तालुक्यांत रेल्वेचा मागमूसही नाही. दरम्यान, सिल्लाेड तालुक्यातील औरंगाबाद-जळगाव महामार्गावर औरंगाबादहून ५० किमी अंतरावर निल्लाेड फाट्यावर व्यंकटेश हायस्कूल येथे शाळाखाेल्यांना रेल्वेसारखा रंग दिल्याने जणू काही सिल्लाेडमध्ये रेल्वे अवतरली की काय, असा भास जाणाऱ्या- येणाऱ्यांना हाेताे, तर मुलांमध्येही या रेल्वे शाळेचे खास आकर्षण आहे.
विविध नवीन संकल्पना
शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात. यात सामाजिक सांस्कृतिकसह विविध नवीन संकल्पना मुलांसमाेर मांडल्या जातात. त्यातूनच जर या वर्गखाेल्या एका रांगेत रेल्वे डब्यासारख्या असल्याने याला रेल्वेचा रंग देऊन रेल्वेचीच प्रतिकृती करावी अशी संकल्पना सुचली व दाेन वर्षांपूर्वी ही संकल्पना सत्यात उतरवली.
म्हणून दिले रेल्वेचे स्वरूप
निल्लाेड फाट्यावर असलेल्या या रेल्वे शाळेचे परिसरात माेठे आकर्षण असून परिसरात चारही बाजूने ५० किमी पर्यंत रेल्वेच नसल्याने रेल्वेचे स्वप्न शाळा खाेल्यांच्या रचनेतून सत्यात उतरवले असल्याचे पाहावयास मिळते.
१ ते १२ पर्यंत वर्ग
३५० विद्यार्थी
२०१७ मध्ये रंगोटी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.