आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील भाविकांना 'एमपी'त लुटले, रेल्वे प्रवासात घडला प्रकार; ७ ते ८ लाखाचा ऐवज लंपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला : यागराज त्रिवेणी संगमात कुंभ मेळाव्याच्या पर्वावर स्नानासाठी रेल्वेने जात असलेल्या अकोल्यातील भाविकांना लुटल्याची घटना मध्यप्रदेशात गुरुवारी मध्यरात्री नंतर घडली. लुटारूंनी बंदुकीच्या धाकावर ७ ते ८ लाखाचा ऐवज लंपास केला. दरम्यान, खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी रेल्वे मंत्र्यांशी भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. 


अकोल्यावरून नगर संघचालक गोपाल खंडेलवाल, रेखा खंडेलवाल यांचे समवेत जुगलकिशोर खंडेलवाल, शामली खंडेलवाल, रश्मी खंडेलवाल, दिनेश खंडेलवाल, पुष्पा खंडेलवाल सह १५ भाविक सिकंदराबाद दानापूर रेल्वेने प्रयागराजकडे निघाले हाेते. रेल्वे इटारसी ते पिपरिया रेल्वे स्थानकाच्या दरम्यान जनरल बोगीतून साखळी ओढून १० दरोडेखोरांनी वातानुकूलित बोगीमध्ये प्रवेश केला. त्यांनी बंदूक व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून जवळपास ७ ते ८ लाख रुपयाचा ऐवज लुटला. लुटमार सुरु असल्याचे नगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांचे डब्यातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने ते सावध झाले. त्यामुळे बोगीमधील गोपाल खंडेलवाल व इतर नागरिक बचावले. मात्र खंडेलवाल कुटुंबातील इतरांना लुटमारी सहन करावी लागली. 
 

बातम्या आणखी आहेत...