Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | train ticket rates Between Solapur and Pune

सोलापूर ते पुणे दरम्यानही रेल्वे तिकीट दरामध्ये मिळावी सूट

प्रसाद कानडे | Update - Aug 24, 2018, 12:35 PM IST

काही रेल्वे गाड्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेने दर कमी केले आहेत. चेन्नई -म्हैसूर या शताब्दी एक्स्प्रे

 • train ticket rates Between Solapur and Pune

  सोलापूर- काही रेल्वे गाड्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेने दर कमी केले आहेत. चेन्नई -म्हैसूर या शताब्दी एक्स्प्रेसचे बंगळुरु - म्हैसूर दरम्यानचे तिकीट दर रेल्वेने कमी केले. या पार्श्वभूमीवर पुणे -सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसला पुणे - सोलापूर दरम्यानच्या प्रवासाचे तिकीट कमी केले तर याचा फायदा पुणे व सोलापूरच्या प्रवाशांना होईल. तिकीट दर कमी करायचे अधिकार रेल्वे बोर्डने झोनस्तरावर सरव्यवस्थापकांना दिले आहे. मध्य रेल्वेत असा प्रयोग झाला तर शताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवासी संख्येत वाढ होईल. रेल्वेचे उत्पन्नदेखील वाढेल.


  दक्षिण पश्चिम रेल्वेने आपल्या हद्दीत तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांनी ५ गाड्यांच्या एसी थ्री टियरच्या दरात कपात करून तिथे चेअर कारचे दर लागू केले. हा बदल टप्प्याटप्प्याने संबंधित गाड्यांना लागू होणार आहे. यात गदग -मुंबई एक्स्प्रेस गाडीला गदग ते सोलापूरपर्यंत एसी थ्री टियरच्या दरात कपात केली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर ते पुणे अथवा सोलापूर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाड्यांना एसी थ्री टियर च्या तिकीट दरात सवलत मिळाली तर प्रवाशांची चांगली सोय होईल.


  सोलापूर-पुणे थ्री टियरचे दर
  एक्स्प्रेस गाडयांना ४९५ रुपये, शताब्दी एक्स्प्रेस विना नाष्टा किंवा जेवण ५१० रुपये तेही सुरुवातीचे दर, सुपरफास्ट गाड्यांना ५४० रुपये, चेअर कार - ४५० रुपये. मध्य रेल्वेने जर सवलत दिली तर या सर्व दर्जाच्या गाडीतून सोलापूरकरांना ४५० रुपयांत एसी थ्री टियरमधून प्रवास करता येईल.


  दक्षिणेकडून येणाऱ्या गाड्यांना शक्य
  दक्षिणेकडून मुंबईला येणाऱ्या गाड्या जवळपास गुलबर्ग्यापासून रिकाम्या होतात. यात नागरकोईल -मुंबई एक्स्प्रेस, बंगळुरु -मुंबई उद्यान एक्स्प्रेस, कोईम्बतूर -कुर्ला एक्स्प्रेस, भुवनेश्वर -मुंबई कोणार्क एक्स्प्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना जर सोलापूर ते पुणे अथवा सोलापूर ते मुंबई दरम्यान थ्री टियरच्या दरात कपात करून त्यांना चेअर कारचे दर लावणे शक्य आहे.


  दक्षिण पश्चिम रेल्वेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे पुणे -मुंबई -पुणे दरम्यान काही गाड्यांना हा बदल करणार आहे. एसी थ्री टियरला चेअर कार व स्लीपरला जनरलचे तिकीट दर लावले जातील. या बाबत गाड्यांचा अभ्यास सुरू आहे.
  - शैलेश कुमार, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई

Trending