आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगदलपूर - बस्तर म्हणजे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचे सर्वात मोठे प्रभावक्षेत्र. या भागात ८९ वर्षीय धर्मपाल सैनी यांनी ४३ वर्षांपासून आदिवासी मुलींसाठी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. या मुलींनी शाळेत जावे म्हणून धर्मपाल प्रयत्नरत असतात. या कार्यासाठी त्यांना १९९२ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
केवळ शिक्षणामुळे आदिवासी मुलांची आर्थिक स्थिती सुधारणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी २००४ मध्ये मुलींसोबत मुलांना विविध खेळांचे प्रशिक्षण सुरू केले. या मोहिमेचे यश म्हणजे १५ वर्षांत या भागातून ३ हजार खेळाडू नॅशनल चॅम्पियन ठरले. धर्मपाल या मुला-मुलींना अॅथलेटिक्स, तिरंदाजी, कबड्डी आणि फुटबॉल शिकवतात.
मूळ मध्य प्रदेशातील धार येथील रहिवासी धर्मपाल १९५१ मध्ये महाविद्यालयीन जीवनात अॅथलेटिक्स व व्हॉलीबॉलचे खेळाडू होते. आठवीत असताना त्यांनी बस्तरमधील मुलींच्या शौर्यकथा वाचल्या होत्या. म्हणून त्यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मुलींच्या शिक्षणकार्यात झोकून दिले. १९७६ मध्ये दोन आश्रम उघडले. आज असे ३७ आश्रम असून २१ मुलींसाठी आहेत.
येथील मुले नैसर्गिकरीत्याच अॅथलेट...
येथील सर्व मुले कष्टाळू आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यात अॅथलेटिक्सचे नैसर्गिक गुण आहेत. येथे चांगली अकादमी उघडली तर येथून देशाला चांगले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू मिळू शकतील. अशा अकादमीसाठी प्रयत्न सुरू आहेत. - धर्मपाल सैनी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.