आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trains Cancelled: मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या या ट्रेन झाल्या रद्द; अनेक गाड्यांचे मार्ग असे बदलले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुसळधार पावसामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या ट्रेन्समध्ये मोठे बदल केले आहेत. यात काही गाड्या पूर्णपणे दिवसभरासाठी रद्द करण्यात आल्या. तर काही ट्रेनचे मार्ग थेट बदलण्यात आले आहे. याचा फटका प्रामुख्याने सोलापूर आणि हैदराबादच्या प्रवाशांना बसणार आहे. रेल्वे रुळांवर साचलेले पाणी आणि मंद वाहतुकीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनसवरून ही प्रेस नोट जारी केली आहे.


मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या या ट्रेन झाल्या रद्द...
12115 मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस जेसीओ
12116 सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस
12702 हैदराबाद-मुंबई हुसैन सागर एक्सप्रेस
17032 हैदराबाद मुंबई एक्सप्रेस
51030 बीजापूर-मुंबई फास्ट पॅसेंजर

 

अशा वळवल्या रेल्वे...
- 1 जुलैला 11014 कोयंबतूर-एलटीटी एक्सप्रेस दौंडवर थांबवण्यात आली. तसेच 2 जुलै रोजी सोलापूर येथून 11013 एलटीटी-कोयंबतूर एक्सप्रेस करण्यात आली आहे.
- 11302 बंगळुरू-मुंबई एक्सप्रेस सोलापूर येथे थांबवण्यात आली. आता ही ट्रेन 3 जुलैला दौंड येथून 11301 मुंबई-बंगळुरू एक्सप्रेस म्हणून निघणार आहे.
- 16340 नगरसोल-मुंबई एक्सप्रेस सोलापूर येथे रद्द करण्यात आली. आता ही ट्रेन सोलापूर येथून 16351 मुंबई-नगरसोल होऊन निघणार आहे.
- 17032 हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस पुण्यात थांबवण्यात आली. ही गाडी आता पुण्याहून 17031 मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस होऊन 2 जुलैला निघत आहे.
- 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस 1 जुलैला भुसावळ येथे रद्द करण्यात आली. ही गाडी आता भुसावळवरूनच 12139 मुंबई-नागपूर एक्सप्रेस 2 जुलैला बनून निघत आहे.

बातम्या आणखी आहेत...