आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हांतर्गत २० पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या; पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी काढले आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सोमवारी जिल्ह्यातील २० पोलिस ठाण्यासाठी निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याचे आदेश काढले. यात जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी एकनाथ पडाळे, तालुका ठाण्यात नाशिक ग्रामीण येथून बदलून आलेले दिलीप भागवत व शनिपेठ येथे विठ्ठल ससे यांची वर्णी लागली आहे. 


जिल्ह्यातील १७ पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलण्यात आले. विनंती बदली, प्रशासकीय रिक्त पद व नियमित पदस्थापना या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात रामकृष्ण कुंभार, जामनेर पोलिस ठाण्यात प्रताप इंगळे, मानव संसाधन विभागासाठी गुलाब पाटील, चाळीसगाव ग्रामीण प्रताप शिकारे, रावेरला रामदास वाकोडे, पाचोरा येथे अनिल शिंदे, एरंडोल पोलिस ठाण्यात अरुण हजारे, भुसावळ बाजारपेठ देविदास पवार, शहर वाहतूक शाखा देविदास कुनगर, सायबर क्राईमसाठी अरुण निकम, नियंत्रण कक्ष राजेंद्र परदेशी, आर्थिक गुन्हे शाखेसाठी रणजीत शिरसाठ, सुरक्षा शाखा सुरेश शिंदे, भुसावळ शहर बाबासाहेब ठोंबे आणि धरणगाव पोलिस ठाण्यात चंद्रकांत सरोदे, चोपडा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किसन नजनपाटील, मुक्ताईनगरचे अशोक कडलग यांना त्याच पोलिस ठाण्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. 


दाेन सहायक निरीक्षकांना एक वर्ष मुदतवाढ 
सहायक पाेलिस निरीक्षकांचे नाव अन् कंसात बदली झालेले ठिकाण असे : समाधान पाटील : एमअायडी जळगाव (मारवड), संदीप पाटील : कासाेदा (पाेलिस अधीक्षक वाचक), सारीका खैरनार : भुसावळ शहर (भुसावळ बाजारपेठ), सुरेश शिरसाठ : शहर वाहतूक शाखा, चाळीसगाव (एक वर्ष मुदतवाढ), संदीप पाटील : पिंपळगाव हरेश्वर (एक वर्ष मुदतवाढ), मनाेज पवार : बाजारपेठ, भुसावळ (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव), सचिन बेंद्रे : शनिपेठ, जळगाव (पाचाेरा), महेश जानकर : जळगाव शहर (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव), अाशिष राेही : जळगाव शहर (चाळीसगाव शहर), दिलीप शिरसाठ : मेहुणबारे (पहूर), याेगेश तांदळे : यावल (चाेपडा शहर), सचिन सानप : पाचाेरा (वरणगाव), प्रकाश सदगीर : धरणगाव (अमळनेर), हनुमान गायकवाड : शेंदुर्णी अाे.पी. (धरणगाव), जयपाल हिरे : अडावद (मेहुणबारे), सचिन बागुल : जळगाव तालुका (नशिराबाद), राहुलकुमार पाटील : एमअायडीसी कामकाज वाचक १ (अडावद). 

बातम्या आणखी आहेत...