Home | International | Other Country | Transgender shot dead during live performance in Pakistan, shocking video

Shocking Video: पाकिस्तानात Live परफॉर्मन्स सुरू असताना तृतीयपंथियाचा मर्डर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 10, 2019, 12:25 PM IST

परफॉर्मन्सचा व्हिडिओ शूट केला जात असताना ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात टिपली आहे.

  • Transgender shot dead during live performance in Pakistan, shocking video
    इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानच्या पेशावर येथे लाइव्ह डान्स परफॉर्मन्स सुरू असताना खून करण्यात आला आहे. या ठिकाणी एक ट्रान्सजेंडर नाचताना तिला गोळ्या झाडण्यात आल्या. परफॉर्मन्सचा व्हिडिओ शूट केला जात असताना ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात टिपली आहे. लाइव्ह मर्डरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रान्सजेंडरचे नाव दानिश असे सांगितले जात आहे. दानिशने काही दिवसांपूर्वीच खैबर पोलिसांना एक तक्रार दिली होती. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगताना संरक्षण देखील मागितले होते. परंतु, पोलिसांनी त्यावर दुर्लक्ष केले. परिणामी दानिशला ज्याची भीती होती तेच घडले. हा धक्कादायक व्हिडिओ इस्लामाबादच्या एका पत्रकाराने ट्वीट केला आहे.

Trending