आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक; तीन ठार, 13 जखमी; मद्यधुंद चालकाने प्रवाशांना गप्प केले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- यवतमाळहून सुरतला ट्रॅव्हल्स घेऊन जाणाऱ्या मद्यधुंद चालकाने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकांसह ३ ठार तर १३ जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्रीच्या दोनच्या सुमारास घडला. दरम्यान, भुसावळ येथे बस थांबली असता चालकाने मद्य प्राशन केले. त्यानंतर तो बेदरकारपणे बस चालवत होता. प्रवाशांनी त्याला दोनदा हटकले. मात्र, त्याने प्रवाशांना दमदाटी करून बस चालवणे सुरू ठेवल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. 

 

राजूराम गेनाराम चौधरी (२६, रा. बाडनेर, राजस्थान) शंकर पटेल (४०, दोघेही चालक रा.यवतमाळ) आणि निर्भयसिंग प्रतापसिंग पवार (३९, रा.पलासिया, राजस्थान) क्लीनर अशी मृतांची नावे आहेत, तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

यवतमाळ येथील टाईम स्टार ही स्लिपर कोच ट्रॅव्हल्स यवतमाळ येथून सुरतला जाण्यासाठी निघाली होती, तर लोखंडी पाईप घेऊन ट्रक भुसावळच्या दिशेने जात होता. महामार्गावर दोन्ही बाजूंनी चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. वाहनांना सरळ एका रांगेत जावे लागते आहे. यानंतर चालक बेदरकारपणे बस चालवत होता. 

 

ढाब्यावर ढोसली दारू 
चालक शंकर पटेल याने क्लिनर व सहकाऱ्यांसह भुसावळजवळ एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी ट्रॅव्हल्स थांबवली. जेवण करत असताना त्यांनी मद्य प्राशन केले. यानंतर पटेल याने बेदरकारपणे गाडी चालवण्यास सुरुवात केली. त्यानंतर अपघात झाला. 
 

बातम्या आणखी आहेत...