Home | Maharashtra | Mumbai | travel collapsed in Borghat on Mumbai-Pune national highway

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात कोसळली ट्रॅव्हल्स, काही प्रवासी किरकोळ जखमी

प्रतिनिधी | Update - May 27, 2019, 12:14 PM IST

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, खोपोली पोलिसांसह इस्कॉट टीम घटनास्थळी दाखल

  • travel collapsed in Borghat on Mumbai-Pune national highway

    रायगड - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात आरामबस कोसळली. पुण्याकडे जाणारी अवघड चढणीवर वळण घेताना पाठीमागे येऊन सुरक्षा कठड्यावर अडकल्याने प्रवासी किरकोळ जखमी झाले.

    या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून इतर सर्व प्रवासी सुखरूप आहेत. जखमींना खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आय आर बी यंत्रणा, महामार्ग पोलिस, इस्कॉट टीम, खोपोली पोलिस मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली. बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

  • travel collapsed in Borghat on Mumbai-Pune national highway

Trending