आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्थानकात आता प्रवाशांना मिळणार मसाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात. तसेच गाडीच्या आगमनापर्यंत त्यांचा रेल्वे स्थानकावर विरंगुळा व्हावा, यासाठी विविध प्रयोग करत आहे. सध्या नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आॅक्सिजन पार्लरचा उपक्रम यशस्वी ठरल्याने या प्रकारचे पार्लर आता मुंबई, सोलापूरसारख्या मोठ्या रेल्वेस्थानकावर देखील सुरू करण्यात येणार आहे. आता प्रवाशांना रेल्वे स्थानकामध्ये मसाज यंत्राद्वारे मसाजचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून तो लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता असल्याचे वाणिज्य प्रबंधक कुंदन महापात्रा यांनी सांगितले.

मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या नाशिकरोड रेल्वे स्थानकातून प्रवाशी तिकीट, मालवाहतूक, पार्किंग यांचा समावेश होतो. रिकाम्या जागेतून देखील महसूल मिळावा म्हणून रेल्वेने सध्या प्लॅटफार्मवर आॅक्सिजन पार्लर, मुलांना खेळण्यासाठी कीडस‌् झोन सुरु करुन भाडे आकारणी सुरु केली आहे. आता नव्याने २० खुर्च्या असलेले मसाज झोन तयार करण्यात येणार आहे. भुसावळ विभागात नाशिकरोड, भुसावळ, जळगाव, अकोला, शेगाव अन‌् मनमाड रेल्वे स्थानकावर हे मसाज झोन तयार होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तणावापासून मुक्त होण्यास मदत होईल. दरम्यान,अनेकदा नियाेजित वेळेपेक्षा काही तास रेल्वे गाडी ही उशीराने येत असते. त्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा वेळेस प्रवाशांना या मसाज सेंटरमध्ये जाऊन काही प्रमाणात तणाव निवळण्यास मदत होईल.नाशिकरोड स्थानक जंक्शन होण्याची गरज

रेल्वे प्रशासनाने मसाज झोनचा घेतलेला निर्णय चांगला आहे. मात्र, नाशिकरोड रेल्वेस्थानक जंक्शन झाल्यास बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी वेळ मिळेल. त्यावेळी हा उपक्रम अधिक यशस्वी होईल.
किरण बोरसे, रेल्वे प्रवासी

बातम्या आणखी आहेत...