आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकजवळ भीषण अपघात; बस दरीत कोसळून 4 जणांचा मृत्यू तर 45 जखमी, मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक-जव्हार रोडवरील तोंरगना घाटात ट्रॅव्हल्स बस दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 45 जण जखमी झाले आहेत. जखमीना नाशिकच्या ग्रामीण रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.

 

गुररातमधील भाविक ट्रॅव्हल्सने शिर्डीवरून डहाणूच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जात होते. यावेळी बसचे ब्रेक फेल होऊन बस 25 फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये 56 प्रवासी होते, त्यापैकी 4 जणांचा जागेच मृत्यू झाला तर 45 जण जघमी आहेत. जखमीमध्ये अनेकजण गंभीर असल्याने मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
 

बातम्या आणखी आहेत...