आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उभ्या ट्रकवर ट्रॅव्हल्स धडकली; ६ ठार, २० जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर डी मार्टजवळ मुंबईकडून बेळगावकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुभाजकाला धडकलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. मृतांत तीन जण बेळगाव येथील रहिवासी आहेत. या भीषण अपघातात सहा जण ठार, तर २० जण जखमी झाले. विश्वनाथ विरुप्पाकशी गड्डी (५५ , हुक्केरी), अब्बास अली (४२, अनगोळ), अशोक रामचंद्र जुनघरे (५०, रा. दिवदेववाडी, ता. जावली), डॉ. सचिन शंकर गोंडा - पाटील (३५) आणि गुंडू तुकाराम गावडे (३२) आणि एका अनोळखी व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला.

गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास एक ट्रॅव्हल्स मुंबईहून बेळगावकडे निघाली होती. ट्रॅव्हल्स साताऱ्याजवळील डी मार्टजवळ आली असता टायर फुटून दुभाजकाला धडकलेल्या ट्रकला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्सच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला.

या अपघातात सुमेधा तीरवार (२२), राजश्री जयदीप पाटील (२३), जयदीप रामचंद्र पाटील (३०, सर्व रा. बेळगाव) यांच्यासह २० जण जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्समध्ये एकूण ३० जण प्रवास करत होते. या वेळी दोन चालक व क्लीनरही गाडीत होते. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले.