आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅव्हल्स लुटीचा डाव फसला; तिघे जेरबंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भुसावळ : नागपूरकडून येणारी ट्रॅव्हल्स लूटण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाचपैकी तीन संशयीतांना पकडण्यात बाजारपेठ पाेलिसांना शुक्रवारी रात्री १२.३० वाजता यश आले. संशयितांकडून दाेन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. गुप्त माहितीवरून पाेलिसांनी नाहाटा चौफुली परिसरात ही धडक कारवाई केली. पसार झालेल्या अन्य दाेन संशयीतांचा शाेध सुरू आहे. 


नाहाटा चाैफुलीजवळ वैतागवाडी परिसरात काही अट्टल गुन्हेगार पाण्याच्या टाकीजवळ दराेडा टाकण्याच्या उद्देशाने उभे असल्याची माहिती, बाजारपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक देवीदास पवार यांना मिळाली होती. त्यांनी डीवायएसपी गजानन राठाेड यांना माहिती कळवली. त्यानुसार उपनिरीक्षक अनीश शेख यांनी दोन पथकांसोबत घटनास्थळ गाठले. पाेलिसांना पाहून पाचही संशयितांनी पळ काढला. मात्र, संशयित शुभम साबळे, संदीप खंडारे यांना पोलिसांनी जागेवरच पकडले. तर संशयित सुरेश पवार उर्फ टकल्या याला पाठलाग करुन तलवारीसह पकडण्यात आले. अन्य दोन संशयित कलीम शेख सलीम व गोल्या शेख शरीफ हे पसार झाले. त्यापैकी संशयित कलीम शेख सलीमकडे गावठी पिस्तुल तर गोल्याकडे तलवार होती. पाेलिस उपनिरीक्षक शेख, हवालदार माणिक सपकाळे, संजय भदाणे, गुलबक्ष तडवी, प्रशांत चव्हाण, कृष्णा देशमुख, विनाेद वितकर, संदीप परदेशी, मंदार महाजन, गजानन वाघ यांनी संशयितांना अटक केली. 


गुन्हा केला दाखल :

कारवाई प्रकरणी बाजारपेठ पाेलिस ठाण्यात पाेलिस कर्मचारी याेगेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. डीवायएसपी राठाेड, पोलिस निरीक्षक देवीदास पवार यांनी तिन्ही संशयीतांची कसून चाैकशी केली. अन्य दाेन संशयितांचा पाेलिस पथकाकडून शोध घेतला जात आहे. पाेलिस उपनिरीक्षक निशिकांत जाेशी पुढील तपास करत आहेत. 


 
संशयितांनी दिली कबुली 
पाेलिसांनी पकडलेल्या तिन्ही संशयितांना बाजारपेठ ठाण्यात नऊन चाैकशी केली. टोळीचा प्रमुख कलीम शेख सलीम याच्याकडे गावठी पिस्तूल हाेत्या. त्याच्या सांगण्यावरूनच नागपूरकडून येणारी खासगी ट्रॅव्हल्स थांबवून लुटमार करण्याचा डाव आखल्याची कबुली संशयितांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...