Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | treadmill exercise information in Marathi

ट्रेडमिल : रनिंग+ 3 वर्कआउटसाठी  

जितेंद्र सलुजा | Update - Feb 08, 2019, 12:17 PM IST

ट्रेडमिलचा वेग सामान्य ठेवा आणि त्यावर चाला. चालताना मागचा पाय ९० अंशांच्या अँगलमध्ये ठेवून वाकवा.

 • treadmill exercise information in Marathi

  लोकांचा असा समज आहे की, ट्रेडमिलवर फक्त रनिंग करू शकतो, पण असे नाही. हे तीन प्रकारचे व्यायामही ट्रेडमिलवर सहज करता येतात, ज्यामुळे शरीराला कित्येक फायदे होतात.


  1. वॉकिंग लंजेस
  ट्रेडमिलचा वेग सामान्य ठेवा आणि त्यावर चाला. चालताना मागचा पाय ९० अंशांच्या अँगलमध्ये ठेवून वाकवा. पायाला वाकवताना ट्रेडमिलला स्पर्श होऊ देऊ नका. याप्रकारेच दुसऱ्या पायाने हा व्यायाम करा. यालाच ट्रेडमिलवर चालताना उठण्याबसण्याचा व्यायामही म्हणू शकता.


  2. हिट (HIIT)
  हाय इंटेन्सिटी इंटर्व्हल ट्रेनिंग ट्रेडमिलवर करण्यासाठी ३० सेकंदांपर्यंत जॉगिंग करा. २० मिनिटांपर्यंत सामान्य वेग ठेवून पळा. मग दहा मिनिटांसाठी थांबा. आता एका सेशनमध्ये ५ वेळा पुन्हा करा. ही पद्धत एकाच वेगाने ट्रेडमिलवर वेगाने पळण्यापेक्षा जास्त चांगली आहे.


  3. इनक्लाइन पुशअप
  ट्रेडमिलला बंद करा आणि याच्या टॉप हँडलवर हात ठेवा. डोक्यापासून टाचांपर्यंत शरीराला सरळ ठेवा. आता ट्रेडमिलच्या हँडलच्या मदतीने पुशअप्स करा. या दरम्यान ट्रायसेप्सवर लक्ष केंद्रित करून आपल्या कोपराला स्थिर ठेवा.


  याचे फायदे
  - हाडे मजबूत हाेतात.
  - स्नायूंना आकार मिळतो.
  - वजन कमी करण्यास मदत होते.
  - त्वचा चमकदार होते.
  - शरीरात लवचिकता वाढते.


  ही घ्या दक्षता
  - ट्रेडमिलवर वर्कआउट करताना सतत खाली पाहून नका. यामुळे लक्ष विचलित होते. यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते.
  - या दरम्यान ट्रेडमिलचे हँडल धरू नका. असे केल्यामुळे हातामध्ये लचक बसू शकते.
  - ट्रेडमिलचा वेग एकदम वाढवू नका, यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते.
  - चालत्या ट्रेडमिलवरून उतरण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तुमचे नियंत्रण बिघडू शकते.
  - लवकर वजन कमी करण्याच्या नादात वेग वाढवू नका. यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच होऊ शकते.

Trending