Home | International | Other Country | treasure hunt in mysterious place

जगातील अशी 10 रहस्यमयी ठिकाणे, जिथे आजही खजिन्यांचा शोध सुरूच आहे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 11, 2018, 12:00 AM IST

जगातील काही रहस्यमयी ठिकाणांविषयी तुम्हाला सांगणार आहोत जे कदाचीत तुम्हाला माहिती नसेल.

 • treasure hunt in mysterious place

  जगात अजूनही काही असे रहस्यमयी ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी आजही खजिन्यांचा शोध घेतला जाऊ शकतो. आज तुम्हाला अशाच जगातील काही रहस्यमयी ठिकाणांविषयी सांगणार आहोत जे कदाचीत तुम्हाला माहिती नसेल.

  द लॉस्ट डचमॅनमाइन, अॅरिझोना...

  ही सोन्याने भरलेली खाण आहे. ती अॅरिझोनाच्या अपाचे जंक्शनजवळ रहस्यमयी पर्वतांमध्‍ये आहे. ही खाण इतकी मोठी आहे, की येथे खजिन्याचा शोध घेण्‍याचा प्रयत्न झाला. पण काहीही हातात लागले नाही. याचा शोध घेणा-या अनेक लोकांचा जीवही गेला आहे.


  पुढील स्लाइड्स पाहा फोटोज...

 • treasure hunt in mysterious place

  टिल्या टेपे, अफगाणिस्तान - 

  सोने असलेली ही खाण उत्तर अफगाणिस्तानमध्‍ये आहे. सोव्हिएत-अफगाणच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी 1979 मध्‍ये येथे सर्व्हे केला होता. त्यावेळी त्यांच्या हातात प्रचंड सोने लागले होते. 6 कबरीमध्‍ये येथे 20 हजार सोन्याचे ऑर्नामेंट्स आणि इतर काही वस्तू सापडल्या. आजही याच भागात खूप सोने गाडले गेले आहे.

 • treasure hunt in mysterious place

  एसएस सेंट्रल अमेरिका 

  सप्टेंबर 1857 मध्‍ये एसएस सेंट्रल अमेरिका शिप अटलांटिकमध्‍ये बुडाले होते. यात 30 हजार पाऊंड सोने होते. या सोन्याबरोबर 550 क्रू मेंबर्सही बुडाले होते. या सोन्याची किंमत 1 हजार कोटी रुपय आहे. 

 • treasure hunt in mysterious place

  लेक टॉपलिट्ज, ऑस्ट्रेलिया 

  नाझींनी अमेरिका व ब्रिटनमधून खजाना लुटला होता. मात्र सोबत घेऊन जाऊ शकले नाही. त्यांना हा खजाना ऑस्ट्रेलियाच्या लेक टॉपलिट्जमध्‍ये फेकून दिले. या खजान्याचा बराच शोध घेतला गेला. याचा काहीसा भाग समुद्रात सापडल्याचे वृत्त आहे. पण सर्व खजिना कोणाच्या हातात लागला नाही. 

 • treasure hunt in mysterious place

  पेरेश्‍छेपिना ट्रेझर, युक्रेन 

  युक्रेनच्या माला पेरेश्‍छेपिना गावात 1912 मध्‍ये एक मेंढपाळाला खजिना सापडला होता. खजिना पूर्वी बल्गेरिया साम्राज्याचा स्थापना करणा-या कुवरत यांचा असल्याचे मानले जाते. येथे 21 किग्रा सोने व 50 किग्रा चांदी गाडण्‍यात आले आहे. एकदा येथून बायजन्टाइन साम्राज्याचे सुवर्ण नाण्‍यांचा हार मिळाला होता.

 • treasure hunt in mysterious place

  अंबर रुम, रशिया 

  सेंट पिट्सबर्गचे कॅथरीन राजवाड्यातील अंबर रुम खजिन्याची खाण आहे. हे 18 व्या शतकात बनवले गेले होते. दुस-या महायुध्‍दात हे नष्‍ट झाले होते. जर्मनीचे सैनिकांनी 1941 मध्‍ये या ठिकाण लूटले. जेव्हा 1944 मध्‍ये जर्मनीवर बॉम्ब टाकण्‍यात आला, तेव्हा या रुममधील खजिना लपवला गेला होता. आजपर्यंत खजिना कोणाचाही हातात लागला नाही. या खजिन्याची किंमत 953 कोटी असल्याचे सांगितले जाते. 

 • treasure hunt in mysterious place

  मोंटेझुमा ट्रेझर, मेक्सिको

  मोंटेझुमाचा खजिना कासा ग्रँडच्या खडकात दडले आहे. याच्याशी संबंधित अनेक कथा सांगितले जातात. अमेरिका-मेक्सिको युध्‍दाच्या वेळी स्थानिक लोक अॅरिझोनाच्या पर्वतांवर सोने मिळवण्‍यासाठी गेले तेव्हा मेक्सिकोच्या सामंतांनी त्यांना कैदी बनवले. दरम्यान अमेरिकेचे लष्‍कर या पर्वतांवर पोहोचले. युध्‍द सुरु झाले. मेक्सिकोच्या लोकांना हा खजिना लपवला. या युध्‍दात सर्व मेक्सिकन मारले गेले. 

 • treasure hunt in mysterious place

  द ओक आयलँड मनी पिट, कॅनडा 

  अनेक ट्रेझर हंटर्सने कॅनडाच्या द ओक आयलँड मनी पिटमध्‍ये खजिना शोधण्‍याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कोणालाही यश मिळाले नाही. वास्तविक मनी पिटमध्‍ये अनेक वस्तू सापडल्या. यामुळे खजिना असण्‍याची शक्यता दिसू लागली. या खजिनाविषयी सर्वप्रथम विचार डॅनियल मॅगिनीज यांना केला. त्यांना या आयलँडवर एक मोठा खड्डा दिसला. यानंतर टेझर हंटर्स खजिन्यासाठी या जागेवर तुटून पडले. 

 • treasure hunt in mysterious place

  रामसेचा खजिना, इजिप्त 

  या खजिन्याची विचित्र कथा आहे. इजिप्तचा राजा रामसे तिसरा खजिना जमा करण्‍याचा छंद होता. हा खजिना वाचवण्‍यासाठी त्याने दोन आर्किटेक्ट्स एगामेडेस व ट्रोफोनियसला बोलवले. त्यांना हा खजिना सील केला व रामसेच्या राजवाड्याच्याजवळ दगडांची इमारती बांधून ठेवली. या खजिन्यापर्यंत कोणीही पोहोचलेले नाहीत. 

 • treasure hunt in mysterious place

  कोकोज आयलँड ट्रेझर, मध्‍य अमेरिका 

  लिमा ट्रेझर कोकोज आयलँडमध्‍ये गाडण्‍यात आले असल्याचे सांगितले जाते. हे बेट कोस्टा रिकाच्या किना-यावर आहे. यास थॉम्पसन नावाच्या चाच्याने1821-22 साली गुहांमध्‍ये गाडले होते. हा खजिना शोधण्‍यासाठी आतापर्यंत 380 वेळा प्रयत्न करण्‍यात आला. मात्र हातात काहीच लागले नाही. हा खजिना शोधण्‍याचा प्रयत्न प्रसिध्‍द ट्रेझर हंटर आगस्त गिजलरनेही केला. मात्र यश मिळाले नाही. 

Trending