आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंग्लंडमध्ये असणा -या मुलीला भेटायला गेले होते, त्या वेळी मला आलेला हृद्य अनुभव आहे. दि. 12 सप्टेंबरला मी मुंबईहून इंग्लंडकडे जाण्यासाठी निघाले असताना दुपारी 12.55 चे जेट एअरवेजचे विमान होते. बरोबर 12.55 च्या सुमारास ते विमान पूर्ण भरले होते. तेथील कर्मचारी सुरक्षित प्रवासात घ्यावयाच्या काळजीबद्दल योग्य त्या सूचना देत होते. साधारणत: तेथे 1.30 पर्यंत सर्व काही सुरळीत चालू होते; पण याच सुमारास आमच्या मागील आसनावर बसलेली एक महिला अचानक बेशुद्ध झाली, त्यानंतर सर्व प्रवासी अतिशय घाबरले आणि त्यांची धावपळ उडाली.
तत्काळ विमानातील सर्व कर्मचा-यांनी त्या महिलेच्या आसनाकडे धाव घेतली. तेथे अन्य प्रवासीही जमा झाले होते. त्या प्रवासात एक डॉक्टरसुद्धा होते. त्यांनी त्या बाईना तपासले, तिच्यावर प्रथमोपचार करून औषध दिले; परंतु त्याने काहीच सुधारणा झाली नाही. शेवटी तिला ऑक्सिजनसुद्धा दिला; पण तरीही त्या स्त्रीच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती. अशा परिस्थितीत पायलटने मुंबईला नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि दुपारी 2.30 वाजता विमान परत मुंबईला आणण्याचा संदेश प्राप्त झाला. विमान मुंबईला परत नेण्यात आले. ही घटना मोजक्याच प्रवाशांना कळली होती. साधारण सायंकाळी 4 च्या सुमारास खिडकीतून छत्रपती शिवाजी विमानतळ अशी अक्षर दिसली तेव्हा सर्व उलगडा झाला. विमान उतरल्यानंतर जेटचे कर्मचारी आणि डॉक्टरांच्या चमूने सुसज्ज रुग्णवाहिकेत बेशुद्ध असलेल्या त्या महिला प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, विमानात पुन्हा इंधन भरण्यात आले. बदली कर्मचारी आणि सर्व सोपस्कार होऊन विमानाने सायंकाळी 5.10 वाजता लंडनकडे उड्डाण केले. यातच आमचा हा प्रवास तब्बल 14 तासांचा झाला. तेव्हा मला वाटते, असे प्रसंग क्वचितच येत असावेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.