आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये डाॅक्टरांनी काेमात गेलेल्या ७ जणांना घाेषित केले मृत; NIच्या मदतीने उपचार, सातही रुग्ण अाले शुद्धीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा एका माेठा व यशस्वी कारनामा समाेर अाला अाहे. तेथे काेमात गेलेल्या सात रुग्णांना वर्षभरापूर्वी डाॅक्टरांनी ब्रेनडेड घाेषित केले हाेते. हे रुग्ण शुद्धीवर येण्याची अाता काेणतीही शक्यता नाही, असेही त्यांनी सांगून टाकले हाेते. त्यामुळे एअाय डाॅक्टरांची मदत घेण्यात अाली. त्यात संबंधित रुग्णांबाबत अजून अाशा अाहे व वर्षभर उपचार केल्यास ते शुद्धीवर येऊ शकतात, असे सांगून अखेर एअाय डाॅक्टरांनी खऱ्या डाॅक्टरांना चुकीचे असल्याचे सिद्ध केले. सातही रुग्णांवर वर्षभर उपचार केले व अाता सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा हाेऊन शरीरात हालचाली दिसून अाल्या अाहेत. 


या सात रुग्णांमध्ये १९ वर्षीय तरुणासह एक वृद्ध महिला व ५ इतर रुग्णांचा समावेश अाहे. ते सर्व जण कसल्या तरी अपघाताचे शिकार ठरले हाेते व नंतर अचेतन अवस्थेत म्हणजेच काेमात गेले हाेते. तसेच त्यांच्याच सुधारणेची कुठलीही लक्षणे दिसून येत हाेती. डाॅक्टरांनी त्यांना काेमा रिकव्हरी स्केलवर २३ गुण दिले हाेते. इतक्या गुणांचा अर्थ रुग्ण सामान्य हाेण्याची अपेक्षा जवळपास नाही, असा हाेताे. जितके कमी गुण तितकी सुधारणेची शक्यता जास्त असते. त्यामुळे डाॅक्टरांनी संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांना ते बरे हाेण्याची कुठलीही अाशा दिसत नसल्याचे सांगून त्यांचे अवयव दान करण्याचा सल्लाही देऊन टाकला हाेता. दरम्यान, हीच काेमा रिकव्हरी चाचणी एअाय डाॅक्टरांकडून केली असता, त्यांनी या रुग्णांना २० गुण देऊन वर्षभरात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे संंबंधित रुग्णांची पूर्ण जबाबदारी एअाय डाॅक्टरांकडे साेपवण्यात अाली. त्यांची प्रकृती सुधारत अाहे. 

 
संशाेधनाने साकारले एअाय डाॅक्टर 
हे एअाय डाॅक्टर बीजिंगमधील चायनीज अकॅडमी अाॅफ सायन्स व पीएलए जनरल हाॅस्पिटलने मिळून तयार केले अाहेत. ८ वर्षे संशाेधन करून २०१७ मध्ये हे डाॅक्टर पूर्णपणे तयार झाले. अातापर्यंत एअाय डाॅक्टर महत्त्वाच्या शस्त्रक्रियांमध्ये खऱ्या डाॅक्टरांना मदत करत हाेते; परंतु एअाय डाॅक्टर एकटेच रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम असल्याचा दावा तज्ञांनी केला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...