आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tree Came Out From The Roof Of A Car..? Photos Of The Car Went Viral On Social Media

एका रात्रीत कारचे छत फाडून उगवल झाड..? कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दैवी चमत्कार असल्याचे सांगत फोटो व्हायरल केले जात आहेत

पॅरिस- तुम्ही अनेक विचित्र घटना बघितल्या असतील. पण, सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले दृष्य तुम्हाला चकीत करुन टाकेल. व्हिडिओमध्ये एका कारच्या छतामधून झाड बाहेर आल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटणे सहाजिक आहे. गाडीतून एका रात्रीत झाड उगवल्याचा दावा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांनी केला आहे. कारचे छत फाडून झाड वर येणे हा दैवी चमत्कार असल्याचे सांगत हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला जातोय. घटना फ्रान्समधील असून तिथे एका रात्रीत उगवलेले हे झाडं सध्या आकर्षणा विषय ठरत आहे. पण खरच या फोटोमागील सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास सोशल मिडियावरुन पसरवल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी अफवा असल्याचे सिद्ध झालयं. या व्हिडिओसंदर्भात इंटरनेटवर सर्च केल्यावर हा व्हिडिओ फ्रान्समधील एका ओइस्ट फ्रान्स डॉट एफआर या वेबसाईटने प्रकाशित केल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ फ्रान्समधील नट्स परिसरामध्ये चित्रित करण्यात आला आहे.वेबसाईटवरील वृत्तानुसार गाडीच्या छतामधून वर आलेले हे झाड म्हणजे एक कलाकृती आहे. रॉयल डिलक्स या थेअटर कंपनीने ८ नोव्हेंबर रोजी नट्स येथील बेलेवुमधील एका चौकात ही कलाकृती साकारली होती. या कलाकृतीमध्ये गाडीचे छप्पर फाडून झाड वर आलेले दिसत आहे. कंपनीनेच शेअर केलेल्या पोस्टवरुन भारतामध्ये दैवी चमत्काराच्या नावाखाली व्हायरल होणारा व्हिडिओ खोटा असल्याचे सिद्ध होत आहे.