आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 झाडे तोडणाऱ्या 4 आरोपींना न्यायालयाने सुनावली 270 झाडे लावण्याची शिक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतापगड (राजस्थान) - येथील जिल्हा सत्र न्यायालयाने वृक्षतोड केल्यामुळे चार आरोपींना एक अनोखी शिक्षा सुनावली आहे. रामा उर्फ रामलाल तेली, जसवंत धोबी, दिनेश तेली आणि मोहम्मद हुसैन या चौघांवर वनक्षेत्रातील 27 वृक्ष तोडण्याचा आरोप होता. त्यामुळे आरोपींनी न्यायालयात जमानतीसाठी अर्ज दाखल केला. पण कोर्टाने त्यांना दोषी ठरवले आणि 270 वृक्ष लावून त्यांची देखरेख करण्याचा आदेश दिला. वनविभागाकडून तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. या कृत्यावर कोर्टाने म्हटले होते की, आरोपींचा पर्यावरण आणि वनविभागाच्या संपत्तीचे नुकसान करण्याचा उद्देश होता. त्यामुळे या सर्वांनी वृक्षतोड केली.

 


कोर्टाने सांगितले, झाडे लावून फोटो दाखवा
या प्रकरणात शिक्षा सुनावताना न्यायाधीशाने सांगितले की, सर्व आरोपींना 270 आवळ्याची झाडे लावल्याचे फोटो न्यायालयात सादर करावे लागतील. तसेच, वनविभागालाही या झाडांचे निरिक्षन करून एक अहवाल सादर करावा लागेल. त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी देण्यात आलेल्या शिक्षेचे आरोपी पालन करतील. यासोबतच न्यायालयाने सांगितले की, आरोपींना दर तीन महिन्यांनी झाडांची माहिती न्यायालयात सादर करावी लागेल.

 

20 मार्च रोजी जप्त केली होती तोडलेली झाडे 
वन अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी, गंधेर भागातील काही वृक्ष तोडल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे घटनास्थळी जाऊन आमच्या टिमने कारवाई केली. यादरम्यान सातपैकी एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे हँड कटर, करवत आणि तोडलेली लाकडे जप्त करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...