आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Trees Cut In The Fire Department Without Taking A Permission Of Forest Department

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृक्षतोडीचे पुरावे नष्ट करण्यासाठी पेव्हर ब्लॉक काढून नव्याने रिपेअरिंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- वाळूजमधील अग्निशमन विभागात काही महिन्यांपूर्वी वन विभागाची परवानगी न घेता वृक्षतोड केली होती. २५ मे रोजी शरद कुलकर्णी यांनी वन विभागाकडे लेखी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वन विभागाकडून करण्यात आलेल्या पाहणीत वृक्षतोड झाल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. सध्या हे प्रकरण नव्याने वरिष्ठ पातळीवर पुढे येत आहे. वृक्षतोडीचे पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने शनिवारी लाखो रुपये खर्चून बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक जेसीबीच्या मदतीने उखडून, वृक्षतोडीचे बुंधे व मुळ्या बुडासकट उपटून त्यांची परस्पर विल्हेवाट लावली. तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप तक्रारदार कुलकर्णी यांनी केला आहे. प्रशासनाकडून त्यांच्याच कार्यक्षेत्रातील वृक्षांवर विनापरवानगी राजरोस कुऱ्हाड चालवली जात असल्याची खंत वृक्षप्रेमींकडून व सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

 

प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न :

साधारण, आठ ते दहा महिन्यांपूर्वी वाळूज येथील अग्निशमन विभागातील कार्यालय व रहिवासी परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी वन विभागाच्या परवानगीशिवाय वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्यानंतर एका तक्रारदाराने दौलताबाद वन विभागाकडे तक्रार केली. यावर संबंधित अधिकाऱ्याने माती-मुरुमाच्या मदतीने वृक्षतोड केलेले बुंधे दडपून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या बुंध्यांना दडपून त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले. एवढ्यावरच न थांबता आता हे प्रकरण पुन्हा नव्याने पुढे येत असल्यामुळे बसवलेले पेव्हर ब्लॉक किरकोळ कारण पुढे करत काढून वृक्षांचे अवशेष मुळांसकट उखडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

 

संबंधितांवर कारवाई करा 
संबंधित अग्निशमन अधिकारी कृष्णा डोंगरे व त्यांना मदत करणारे खुलताबाद वन विभागाचे मनोज कांबळे व इतरांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी या वेळी कुलकर्णी यांनी प्रशासनाकडे केली.