आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित मुलासोबत बेपत्ता होती तरुणी, गावात येताच कुटुंबियांनी ओलांडल्या सर्वच मर्यादा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - युवकांचा घोळका एका तरुणीला बेदम मारहाण करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. ही घटना मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी आपल्याच गावातील एका तरुणासोबत बेपत्ता होती. परतली तेव्हा तिच्या कुटुंबियांनी तिला बेदम मारहाण करून व्हिडिओ बनवला. तसेच तिच्यावर आपल्या समाजात लग्न करण्यासाठी दबाव टाकला. या घटनेच्या 3 दिवसांनंतर पोलिस आरोपी आणि त्या तरुणीपर्यंत पोहोचले. या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदिवासी बहुल धार जिल्ह्यातील बाग परिसरात ही घटना घडली. पीडित तरुणी (21) भिलाला आदिवासी समुदायातून आहे. ती आपल्याच गावात राहणाऱ्या एका दलित युवकाच्या प्रेमात पडली होती. कुटुंबियांच्या भीतीने ती आपल्या प्रियकरासोबत पळाली होती. परंतु, 25 जून रोजी तरुणीच्या कुटुंबियांनी जोडप्याला शोधून काढले आणि त्याच दिवशी एका पिक-अप व्हॅनमध्ये टाकून त्यांना एका मोकळ्या ठिकाणी नेले. याच ठिकाणी तरुणीला गाडीतून ओढून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पीडितेने लाख विनवण्या केल्या. पण, नराधमांना तिच्यावर दया आली नाही.


पिक-अप व्हॅनच्या नंबरवरून पोलिसांनी शोधून काढले आरोपी
पोलिसांपर्यंत हा व्हिडिओ तीन दिवसांनंतर पोहोचला. ही घटना आपल्याच जिल्ह्यातील असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणीला ओढून काढण्यात आलेल्या पिक-अप व्हॅनचा नंबर दिसून आला. त्याच नंबरच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. मारहाण करणाऱ्यांमध्ये तरुणीचा भाऊ, काका, चुलत भाऊ आणि गावातील तरुण असे सात आरोपी आहेत. त्यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली.