आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसापेक्षा घातक जीव जगात नाहीच! मगरीने एक माणूस काय मारला... गावाने मिळून केली 300 मगरींची कत्तल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता - इंडोनेशियात एका मगरीने एका माणसाला काय मारले अख्खा गाव पिसाटला. संतप्त जमाव सूड उगवण्यात इतका आंधळा झाला की त्या सर्वांनी मिळून एक-दोन नव्हे, तर तब्बल 300 मगरी मारल्या. गावातील युवक, महिला, वृद्ध आणि बालक सगळेच आप-आपल्या हातात मिळेल ते अवजार घेऊन शिकारवर निघाले. कुणी धारदार कुऱ्हाड तर कुणी मॅशेटे आणि तलवारींनी एक-एक मगर शोधून तिची कत्तल केली. याच वर्षी जुलैमध्ये घडलेल्या या घटनेतून माणसापेक्षा घातक जीव या जगात नसल्याची प्रचिती आली. 


पापुआ प्रांतात राहणाऱ्या या आदिवासी समुदायाच्या परिसरात मगरींची एक फार्म आहे. त्याच ठिकाणी सुगिटो नावाचा एक आदिवासी पुरुष आपल्या गायी-म्हशींसाठी गवत शोधायला गेला होता. मात्र, अचानक पाय घसरल्याने तो मगरीच्या पिंजऱ्यात पडला. यानंतर मगरींनी सुगीटोचा पाय कापला. झटापटीमध्ये त्याचे डोके पिंजऱ्याच्या भिंतीला आदळले आणि सुगीटोचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती सुगीटोच्या कुटुंबियांना कळाले तेव्हा त्यांनी अख्खे गाव गोळा करून पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मगरींच्या फार्म हाऊस व्यवस्थापनाने त्यांना भरपाईचे आश्वासन दिले होते.


पीडित सुगीटोवर शनिवारी अंत्यसंस्कार पार पडले. त्यावेळी अख्खा गाव जमा झाला होता. त्याच दरम्यान गावातील युवक भडकले आणि मिळेल ते धारदार शस्त्र घेऊन मगरींच्या फार्मच्या दिशेने निघाले. त्यांना पाहून गावातील अबाल वृद्धांनी सुद्धा हातात कुऱ्हाड आणि सुऱ्या घेऊन फार्म गाठले. या जमावाने 4 इंची मगरींसह मोठ-मोठ्या एकूणच जवळपास 300 मगरींची कत्तल केली. इंडोनेशियात मगरी आणि सुसरच्या विविध प्रजाती आढळतात. त्यांना संरक्षण देण्यासाठी अशा प्रकारचे फार्म स्थापित करण्यात आले आहेत. पापुआ प्रांतात घडलेल्या या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...