आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिन्मयानंदवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक, खंडणी मागितल्याचे आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिन्मयानंदवर रेपचे आरोप लावणाऱ्या तरुणीला खंडणी प्रकरणात अटक

न्यूज डेस्क - माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंदवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीला बुधवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. एसआयटीने तिच्यावर खंडणी मागितल्याचे आरोप लावून अटक केली आहे. तिने कथिरित्या चिन्मयानंदकडून 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. अटकेनंतर पीडितेला मेडिकल टेस्टसाठी नेण्यात आले. उत्तर प्रदेशचे पोलिस प्रमुख ओपी सिंह यांनी यासंदर्भातील माहिती जारी केली.


तत्पूर्वी मंगळवारी पीडित तरुणीने शहाजहापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तसेच पुन्हा आपला जबाब नोंदवण्यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती याचिका विचारात घेतली. परंतु, तात्काळ सुनावणीस नकार देताना कोर्टाने यासाठी 26 सप्टेंबरची तारीख निश्चित केली. त्याहीपूर्वी पीडितेने सोमवारी अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती. या ठिकाणी तिने आपल्या अटकेवरील स्थगिती वाढवण्याची आणि जबाब पुन्हा नोंदवून घेण्याची मागणी केली होती. परंतु, हायकोर्टाने तिची याचिका फेटाळून लावली. पीडितेला यासंदर्भात दिलासा हवा असल्यास ती स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करू शकते असे हायकोर्टाने म्हटले होते. परंतु, स्थानिक न्यायालयाने सुद्धा 26 तारखेपूर्वी सुनावणी घेण्यास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...