आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई : दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना रविवारी अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली दिली गेली. 30 बेकरी तज्ज्ञांनी डॉ. कलाम यांचा फोटो असलेला 2020 किलो ग्रॅमचा केक बनवला होता. केक एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सामील केला गेला आहे.
डॉ. कलाम यांनी 2020 मध्ये भारताला सुपरपॉवर बनवण्याचे स्वप्न पहिले होते. आयोजन चेन्नईच्या बाहेरील भागांत कट्टुपक्कममध्ये डॉ. कलामयांचे पुतणे एपीजे शेख सलीम आणि इतर प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत केले गेले होते. ही पहिलीच अशी वेळ आहे जेव्हा एशियामध्ये एवढा मोठा कलाम साहेबांचे छायाचित्र असलेला केक बनवला गेला. 25X31 फूट एवढ्या आकाराचा हा केक 30 बेकर्सने केक वर्ल्ड डायरेक्टर लॉरेंसच्या दिग्दर्शनात तयार केला होता. यामध्ये 500 किलो ग्रॅम मैदा, 650 किलो ग्रॅम साखर आणि 16,000 अंड्यांचा वापर केला गेला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.